शिवणी येथील कचरा डेपो विरोध | Protest against waste depot at Shivni
शिराळा: वंचित बहुजन आघाडी शिराळाच्यावतीने शिराळा नगरपंचायत प्रस्तावित शिवणी येथील कचरा डेपोस विरोध असल्याचे निवेदन शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना देण्यात आले .
शिवणी येथील कचरा डेपो विरोध | Protest against waste depot at Shivni
या निवेदनात म्हटले आहे , शिराळा शहरातील कचरा शिवणी येथील गावठाण जमिनी मध्ये टाकून त्या ठिकाणी मशनरी बसविण्याचे नगरपंचायतीचे प्रस्तावित आहे . पण सदर कचरा डेपो त्या ठिकाणी झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढणार आहे . सदर ठिकाण गावाच्या वरील बाजूस चढावर असल्याने सदर कचऱ्या मधून वाहणारे पाणी शिराळ्याच्या ओढायामधून वाहून शिराळा शहरांमध्ये प्रदूषण वाढणार आहे .
शिवणी येथील कचरा डेपो विरोध | Protest against waste depot at Shivni
शिवणी गावास ऐतिहासिक वारसा असून त्याठिकाणी महादेवाचे मंदिर आहे . त्या ठिकाणी हा कचरा डेपो होणे अत्यंत दुर्दैवी आहे . सदर जागा नगरपंचायतीने मिळविल्याने त्यांचे अभिनंदन . पण सदर जागेचा वापर कचरा डेपोला करण्याऐवजी व्यायाम शाळा , अभ्यासिका , नाना नानी पार्क साठी करावा . यावेळी वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा सम्राट शिंदे , दत्तात्रय यादव , जयसिंगराव शिंदे , वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव कांबळे , तालुका अध्यक्ष निखिल कांबळे , सचिन लोहार , संदीप पवार , किरण कार्वेकर , अरुण थोरात , स्वप्निल कांबळे , युवराज सातपुते , निखिल संजय नलवडे उपस्थित होते
शिवणी येथील कचरा डेपो विरोध | Protest against waste depot at Shivni
शिवनी गावास ऐतिहासिक वारसा असून त्याठिकाणी महादेवाचे मंदिर आहे . त्या ठिकाणी हा कचरा डेपो होणे अत्यंत दुर्दैवी आहे . सदर जागा नगरपंचायतीने मिळविल्याने त्यांचे अभिनंदन . पण सदर जागेचा वापर कचरा डेपोला करण्याऐवजी व्यायाम शाळा , अभ्यासिका , नाना नानी पार्क साठी करावा . यावेळी वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा सम्राट शिंदे , दत्तात्रय यादव , जयसिंगराव शिंदे , वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव कांबळे , तालुका अध्यक्ष निखिल कांबळे , सचिन लोहार , संदीप पवार , किरण कार्वेकर , अरुण थोरात , स्वप्निल कांबळे , युवराज सातपुते , निखिल संजय नलवडे उपस्थित होते.
शिवणी येथील कचरा डेपो विरोध | Protest against waste depot at Shivni
0 Comments