BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रेठरे धरण येथे बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू | Leopard and fox die at Rethare Daran

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
 रेठरे धरण येथे बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू | Leopard and fox die at Rethare Daran

 रेठरे धरण येथे बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू | Leopard and fox die at Rethare Daran

रेठरे धरण (ता . वाळवा ) येथील ओझर्डे शिव या नावाच्या  संपत जाधव यांच्या शेतात शाळू पिकात दोन वर्षे वयाच्या नर जातीच्या बिबट्याचा  मृतदेह आढळून आला.हा मृत्यू  दुसऱ्या बिबट्याच्या झटापटीत झाला असावा असा अंदाज आहे. त्याच परिसरात कुजलेल्या अवस्थेत कोल्ह्याचा मृतदेह आढळून आला.
ही माहिती समजताच  शिराळचे वनक्षेत्रपाल  सचिन जाधव  व  अधिकाऱ्यांनी घटनास्थळी  धाव घेऊनपंचनामा केला . 
 रेठरे धरण येथे बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू | Leopard and fox die at Rethare Daran
 
याबाबत सामाजेलेली अधिक माहिती अशी, रेठरे धरणच्या   पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावरील ओझर्डे रेठरे धरण हद्दीवरील संपत जगन्नाथ जाधव यांच्या शाळूच्या  शेतात व विजय आनंदा नांगरे पाटील यांच्या शेताच्या हद्दीवरील बांधावर बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले .हा  रात्रीवेळी मृत्यू झाला असावा , असा अंदाज व्यक्त केला जात आहे . रविवारी सकाळी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समजताच घटनास्थळी रेठरे धरण येथील नागरिकांनी गर्दी केली होती . 

 रेठरे धरण येथे बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू | Leopard and fox die at Rethare Daran
घटनास्थळी माहिती घेण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित साजने यांनी भेट देऊन या बिबट्याच्या शरीरावरील काही जखमा आहेत का याची पाहणी केली .
 या बिबट्याचा पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाच्या व्हॅनमधून मृत बिबट्यास इस्लामपूर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन केले. त्यावेळी  बिबट्याच्या शरीरावर काही जखमा ( छिद्रे ) आढळून आल्या . त्या दुसऱ्या बिबट्याने केलेल्या झटापटीत झालेल्या असण्याचा अंदाज असून , नर बिबटे हे दोघे एकत्र राहू शकत नाहीत , ते एकमेकांच्या हद्दीत दुसऱ्यास येऊ देत नाहीत , अशावेळी त्यांच्यात झटपट होण्याच्या घटना घडतात . यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव , वनपाल सुरेश चरापले , वनरक्षक रायना पाटोळे , वनरक्षक अमोल साठे , सहाय्यक वनरक्षक शहाजी खंडागळे , वनमजुर अनिल पाटील , पांडुरंग उगळे , सचिन कदम उपस्थित होते .
 रेठरे धरण येथे बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू | Leopard and fox die at Rethare Daran
 
 यावेळी रेठरे धरण येथील उद्योजक दादासो पाटील , हर्षवर्धन पाटील , माजी सरपंच सुदाम पाटील , सुहास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली  दरम्यान , सदर घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटावर एक कोल्हा चार ते पाच दिवसापूर्वी मरुन पडल्याचे वनअधिकाऱ्यांना दिसून आले आहे . येथील कामेरकर मळा परिसरात पहाटे प्रदीप राजाराम पाटील यांनी पाळलेले त्यांचे कुत्रेदेखील बिबट्याने झडप घालून पळवून नेल्याची घटना घडली आहे . त्यामुळे हा बिबट्या हा होता की दुसरा बिबट्या  होता याबाबत साशंकता आहे .
 रेठरे धरण येथे बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू | Leopard and fox die at Rethare Daran
 
मृत्यू बाबत साशंकता असल्याने या मृत झालेल्या बिबट्याची  किडनी , लिव्हर , ( व्हिसेरा ) तपासणीसाठी  उद्या न प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून नंतर आणखी माहिती मिळू शकते अशी माहिती वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी दिली.
 
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments