BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वतःचे मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

सांगली / प्रतिनिधी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतःचे मंत्रीपद अबाधित रहावे म्हणून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपचे उमेदवार पाडले. त्यात शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेश क्षीरसागर, सुरेश हाळवणकर यांचा समावेश होता. जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या विरोधातील शिवसेना उमेदवाराविरुध्द भाजपने गद्दारी केली असाही आरोप शिवसेनेचे  उपजिल्हाप्रमुख शंभूराजे  काटकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

   सांगली जिल्ह्यातील कडेगाव मतदारसंघ शिवसेनेने भाजपला विकला असा आरोप  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

    यावेळी ते म्हणाले,शिवाजीराव नाईक हे चंद्रकांत पाटील यांच्या पेक्षा खूप अनुभवी  आहेत. सतरा वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि युती सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू नये वसंतदादांच्या घरात मंत्रीपद जाईल असे उठवून आधीच चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षे त्यांना त्रास दिला .

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

 कडेगाव मधून भाजपने पळ काढला. त्यांना विश्वजीत कदम यांना भाजपमध्ये आणायचे होते. त्यासाठी तो मतदारसंघ ताणून धरला होता. मात्र देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांनी दबाव आणून आणि खुली ऑफर देऊन सुद्धा विश्वजीत कदम यांनी काँग्रेस सोडली नाही. म्हणून भाजपने ऐनवेळी तो मतदारसंघ शिवसेनेला सोडला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते लढले. पण त्यांच्याशी भाजपने गद्दारी केली. तिथले पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी शिवसेना ऐवजी नोटाला मतदान केले. ही भाजपची गद्दारीच होती. सांगली जिल्ह्यात वर्षानुवर्षे विरोधक म्हणून नावलौकिक असणारे सर्व नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या राजकारणासाठी घरात बसवले असा खळबळजनक आरोपही  काटकर यांनी केला. 

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

   शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, अनिलराव बाबर, विलासराव जगताप, सांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना पाडण्याचा प्रयत्न चंद्रकांतदादांनी केला. पण गाडगीळ यांची स्वतः ची पुण्याई आणि शिवसेनेने केलेली मदत म्हणून ते थोड्या मतांनी विजयी झाले. इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील यांच्यात भांडण लावून सेनेची उमेदवारी कमकुवत केली असा आरोप काटकर यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरेश हाळवणकर आणि राजेश क्षीरसागर हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याने त्यांनाही पाडण्यासाठी चंद्रकांत दादांनीच विरोधकांना रसद पुरवली असे सांगून सांगली जिल्ह्यातील विरोधक म्हणून लौकिक असणारे आणि वेळोवेळी भाजप-शिवसेनेने जपलेले सर्व नेते चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या राजकारणात बाद केले आणि तेच शिवसेनेवर आरोप करत आहेत असेही काटकर म्हणाले.

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

     कडेगावमध्ये विश्वजीत कदम आले नाहीत म्हणून त्यांनी तो मतदारसंघ ऐनवेळी शिवसेनेला दिला. आपण पक्षाचे वतीने भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना संग्रामसिंह देशमुख यांना शिवसेनेतर्फे निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी असे आवाहन केले होते. मात्र देशमुख परिवारावर चंद्रकांत दादांनी दबाव आणला. देशमुखांनी पळ काढला शिवसेनेने पळ काढला नाही. किंवा मतदारसंघ घेतला नाही पण भाजपने गद्दारी केली हे सत्य असताना दोन वर्षांनी लोकांना विसर पाडून चंद्रकांत पाटील खोटे बोलत आहेत.  

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

 शिवसेना-भाजप युती सरकारला मदत केलेल्या विलासराव जगताप यांच्या विरोधात स्थानिक भाजप नेत्यांना बंड करायला लावले, राजेंद्रअण्णा देशमुख यांना दबावात ठेवले, अजितराव घोरपडे निवडून येऊ नयेत यासाठी राजकारण केले, पृथ्वीराज देशमुख यांच्या ऐवजी कदम गटाशी संधान ठेवले. देशमुखांच्या असलेल्या अडचणीचा गैरफायदा घेतला गेला. अण्णासाहेब डांगे आणि आप्पासाहेब काटकर यांनी आपापल्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्ह्यात उभे केलेले राजकारण आणि काँग्रेसच्या पारंपारिक सत्तागटा विरोधात उभे राहिलेले सर्व विरोधी नेते यांना साथ देऊन जपल्याचे 40 वर्षाचे राजकारण चंद्रकांत पाटील यांनी मातीत घालण्याचा प्रयत्न केला असून नियतीनेच त्यांना मंत्री पदापासून दूर ठेवून महाविकास आघाडीची सत्ता आली हा त्यांच्यावर नियतीने उगवलेला सूड आहे असेही काटकर म्हणाले.

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

ज्येष्ठ नेत्यांनी पाटील यांना धडा शिकवावा

 येत्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी  चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आघाडी करावी आणि धडा शिकवावा त्यांना शिवसेना साथ देईल असेही ते म्हणाले. 

 स्वतःचे  मंत्रिपद अबाधित राखण्यासाठी चंद्रकांतदादांनीच शिवाजीराव नाईक यांना पाडले |It was Chandrakantdada who overthrew Shivajirao Naik to keep his ministerial post intact

Post a Comment

0 Comments