शिराळा छत्रपती संभाजी महाराज यांना सोडविण्याचा प्रयत्न फक्त शिराळा तालुक्यातील लढवैयांनी केला असून आधुनिकतेच्या काळात इतिहास पुसता कामा नये असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे धारकरी अतुल पाटील यांनी केले.
येथील भुईकोट किल्ल्यावर शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, प्रताप पाटील, जयसिंगराव शिंदे, रणजितसिंह नाईक पृथ्वीसिंग नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील लढवैयांनी छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. अखंड देश संकटात असतो त्यावेळी महाराष्ट्र उभा राहतो हा इतिहास आहे. शंभुराजे यांना संगमेश्वर येथे अटक करून पुढे बहादुरगडावर घेऊन जात असताना फक्त शिराळा येथील निवडक सैनिकांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता.यामध्ये शिराळा येथील सरदार तुलाजी देशमुख, अप्पाशास्त्री दीक्षित, जोत्याजी केसरकर व हरबा वडार यांचेसह निवडक सैनिकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने यामध्ये या सरदार व सैनिकांना यश आले नाही.
शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी तेवत ठेवल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्य निर्माण करण्याचे काम संभाजी महाराजांनी केले आहे. यावेळी ॲड अक्षय कदम, संतोष पाटील, नगराध्यक्ष प्रतीभा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक निलेश आवटे यांनी केले. प्रशांत देशमुख, बाबासो गायकवाड, ज्योतीराम चिकुर्डेकर, प्रहारचे अध्यक्ष बंटी नांगरे, सुभाष देशमुख, संग्राम देशमुख,श्रेयश महाजन, अवधुत माजगावकर, रोहन म्हेत्रे, रोहीत गायकवाड, ऋतुराज पाटील, सार्थक माने, सोनाली पवार, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रुपाली कदम, माजी पोलीस निरीक्षक दादासो गायकवाड भटवाडीचे सरपंच विजय महाडिक, उपस्थित होते.
0 Comments