गावरान कोंबड्याचा चुलीवरचा झणझणीत रस्सा भाग २| Gavran chicken gravy on the chul
साहित्य :
- एक देशी कोंबडा कापून बारीक करून घेतलेला.
- फोडणीसाठी तेल, तीळ, जिरे, धने, खोबरं यांचे भाजून केलेली पेस्ट
- चार टोमॅटो,
- चार कांदे, यांची देखील भाजून केलेली पेस्ट
- आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना यांची पेस्ट
- घरगुती लाल तिखट,
- लाल कश्मिरी मिरची पावडर,
- धने- जिरे, पावडर,
- गरम मसाला,
- बारीक चिरलेली कोथिंबीर,
- मीठ.
कृती
सर्वप्रथम चुलीवर एक पातेले ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यावे.
तेल छान गरम झालं की त्यामध्ये हळद आणि मीठ भाजून घ्यावे.
नंतर यात घालणार आता कोंबड्याचे चिकन.
हे चिकन आता आपण पाच मिनिट छान असं भाजुन घेऊन चिकन तेलात भाजल्यामुळे चिकन कच्चा पणा दूर होऊन त्यास छान चव येणार आहे.
पाच मिनिट चिकन तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत.
सर्वप्रथम गरम मसाला आणि काश्मिरी लाल मिरची पावडर घालून आपल्या आवडीप्रमाणे घरचा लाल तिखट यामध्ये घालायचा आहे. आता सर्व मसाले तेलामध्ये छानसे भाजून घ्यायचे आहेत.
मसाले घातले की यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण मिरची कोथिंबीर पुदिना यांची केलेली पेस्ट. ही पेस्ट देखील आपल्याला तेलात छानशी भाजून घ्यायची आहे.
पेस्टला तेल सुटलं की यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आणि कांद्याची केलेली पेस्ट .
सर्व मसाले छान भाजले की यामध्ये आपण घालणार आहोत जिरे धने तीळ आणि खोबरं यांची भाजून बारीक केलेली पेस्ट.
आता सर्व मसाले आपण चिकन मध्ये छान असे मिक्स करून पाच मिनिटात चिकन मध्ये मसाले मुरण्यासाठी झाकण लावून ठेवणार आहोत. पाच मिनिटानंतर याला पुन्हा हलवून घेऊयात आणि आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे तेवढे गरम पाणी ओतून घेऊयात आता आपलं कोंबड्याचे चिकन पूर्ण बघू शिजेपर्यंत झाकण ठेवून रस्सा शिजवून घेऊयात 30 ते 40 विरोधात .आपला रस्ता छानसा शिजून तयार होतो. अशाप्रकारे तयार झालेला आहे. आपला कोंबड्याचा झणझणीत रस्सा.
संपर्क- प्रियांका पाटील ९५४५९२६८९२
0 Comments