BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवजन्मोत्सव सोहळा | Shivjanmotsav ceremony

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  शिवजन्मोत्सव सोहळा | Shivjanmotsav ceremony 

 शिवजन्मोत्सव सोहळा | Shivjanmotsav ceremony 


शिराळा तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावा गावात पाहटे पासून पन्हाळगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात स्वागत करण्यात आले.

 शिवजन्मोत्सव सोहळा | Shivjanmotsav ceremony 

 

 शिराळा येथील भुईकोट किल्ला येथील  कोटेश्वर मंदिरात  शिवजन्मोत्सवानिमित्त  पाळणा गीताचा सोहळा पार पडला. यावेळी  ज्योती शिंदे, सुनंदा सोनटक्के, साधना पाटील, रुपाली कदम ,  विजया  मिरजकर, पूजा पाटील,आशा साळुंखे, पुनम रोकडे, शोभा रोकडे, गौरी साळुंखे,  रेश्मा कदम, साक्षी कांबळे ,डॉ. शिल्पा कुरणे,सुनंदा म्हेत्रे, साक्षी शिंदे उपस्थित होत्या.    

 शिवजन्मोत्सव सोहळा | Shivjanmotsav ceremony 

 

  या कार्यक्रमाचे आयोजन मारुती  रोकडे, महेश माने, सुधीर दाभाडे, अमोल पाटील,दत्तात्रय पाटील,अमोल साठे,सचिन पाटील, विकास रोकडे,विजय करमाळे यांनी केले.

 शिवजन्मोत्सव सोहळा | Shivjanmotsav ceremony 


बेलदारवाडी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव  बेलदारवाडी सकाळी साडे नऊ  वाजता भव्य मिरवणुकीने शिव ज्योतीचे स्वागत करण्यात आले. ११ वाजता  प्रकाश  हॉस्पिटल यांच्या  सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडे सहा वाजता जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व  साडे आठ वाजता  सुधीर बंडगर यांचे शिव व्याख्यान संपन्न झाले.

 शिवजन्मोत्सव सोहळा | Shivjanmotsav ceremony 


 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments