अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi
चुलीवरची खमंग आणि खुसखुशीत पालक वडी खास गावाकडच्या पद्धतीने | kurkurit palak vadi recipe marathi
अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi
साहित्य :-
स्वच्छ आणि ताजी पालक पेंडी २
- वाटी बेसन,
- चवीनुसार मीठ,
- 1 चमचा मीठ
- 1 चमचा जिरे
- 50 ग्राम पोहे (वाटण करून बारीक केलेले)
- खाद्य तेल
- लसूण-मिरची पेस्ट
- लाल तिखट
- घरची लाल चटणी,
- चवीनुसार हळद
- तीळ
- धने-जिरे पावडर,
- ओवा
- पाणी इत्यादी
अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi
कृती :- सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन तो बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, लाल तिखट, तीळ, जिरे, हळद, बारीक केलेले पोहे, लसूण-मिरची पेस्ट, धने-जिरे पावडर घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. त्यांनतर त्यामध्ये बेसन पीठ घालून ते मिश्रण पाणी घालत घालत मळून घ्यायचे. मिश्रण योग्य प्रमाणात मळून झाल्यानंतर त्याचे वडीच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे. आता चुलीवर पाणी गरम करायला ठेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल ओतायचे, एका मोदक पात्रामध्ये गोळे घालून ते चुलीवर उकडत 10 ते 12 मि ठेवायचे. 10 मि. नी वड्या उकडलेत की नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये चाकु घालून पाहायचा. चाकू स्वच्छ आला तर समजायचे की वड्याचे गोळे उकडलेत.
अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi
त्यानंतर त्या बारीक बारीक कापून घेऊन परत एकदा चुलीवर कढई ठेऊन त्यामध्ये तेल गरम करायचे आणि कापलेल्या वड्या तेलात भाजून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपल्या पालक वड्या तयार झाल्या.
संपर्क- प्रियांका पाटील ९५४५९२६८९२
अशा बनवा घरगुती पद्धतीच्या लोहयुक्त पालक वड्या भाग १ | Make such homemade iron-fried palak vadi
0 Comments