BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

९ टक्के लाभांश, दोन पगार बोनस व कोविड १९ हप्तेवाढ योजनेचा लाभ देणारी जनउत्कर्ष संस्था | Jana Utkarsh Sanstha offering 9% dividend, double salary bonus and Covid 19 installment increase scheme.

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

animated-thank-you-image-0019

कोरोनाच्या काळात सभासदांना ९ टक्के लाभांश व कर्मचाऱ्याना दोन पगारा एवढा बोनस देवून संस्थेने सभासद व कर्मचारी यांचे हित जोपासले आहे. तालुक्यात कोविड १९ हप्तेवाढ  ही  योजना राबवणारी एकमेव संस्था आहे. या योजनेच्या माध्यमातून कर्जदार सभासदांना ही दिलासा देण्याचे कामा संस्थेने केले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर यांनी केले.

९ टक्के लाभांश, दोन पगार बोनस व कोविड १९ हप्तेवाढ योजनेचा लाभ देणारी जनउत्कर्ष संस्था | Jana Utkarsh Sanstha offering 9% dividend, double salary bonus and Covid 19 installment increase scheme.

वाकुर्डे खुर्द ता. शिराळा येथे जनउत्कर्ष पतसंस्थेच्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे होते. यावेळी खांडेकर म्हणाले, कोरोना काळात प्रामाणिकपणे नियमित हाप्ते भरणाऱ्या सभासदांना ही  कर्ज हाप्ते वेळेत भरता आले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य  बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ पुणे यांनी पतसंस्थांना कोविड १९  हप्तेवाढ ही योजना लागू करण्यास  सांगितले. त्यानुसार आमच्या संस्थेने ३१ मार्च २०२१  अखेर केवळ  व्याज भरून घेवून  कर्जाच्या मुद्दल रकमेच्या  हप्त्याना  १२ महिन्याची मुदत वाढ दिली. त्यामुळे संस्थेच्या सर्व सभासदांना अडचणीच्या काळात दिलासा मिळाला आहे. ही योजना राबवणारी शिराळा तालुक्यातील एकमेव संस्था आहे.   पारदर्शक कारभार व नेटके नियोजन यामुळे संस्थेने सभासदांना ९ टक्के लाभांश, तर संस्थेचा मुख्य कणा असणाऱ्या कर्मचाऱ्याना दोन पगारा एवढा बोनस दिला आहे. स्थापनेपासून संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे.  संस्थेची सभासद संख्या १५६४ आहे. सध्या संस्थेच्या वाकुर्डे खुर्द,मांगरूळ ,शेडगेवाडी ,शिराळा अशा चार शाखा असून सागाव व मांगले शाखेस मंजुरी मिळाली आहे. त्या ही शाखा लवकरच सुरु होतील.

९ टक्के लाभांश, दोन पगार बोनस व कोविड १९ हप्तेवाढ योजनेचा लाभ देणारी जनउत्कर्ष संस्था | Jana Utkarsh Sanstha offering 9% dividend, double salary bonus and Covid 19 installment increase scheme.

प्रारंभी अहवाल वाचन विजयसिंग खांडेकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक के, वाय. भाष्टे यांनी केले. कार्यक्रमास मुंबई पोलीस निरीक्षक विश्वास पाटील,सांगली बँक शाखाधिकारी अरुण खांडेकर, विश्वास जाधव,व्ही.आर.शिंदे, जग्गन्नाथ भोसले, पांडुरंग शिंदे,  गणपती जाधव, दिनकर जाधव,अशोक खोत,महादेव जाधव, मारुती पाटील,संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे,  संस्थेच्या उपाध्यक्षा इंदुताई भाष्टे, संचालक शांताराम जाधव, जनार्धन कांबळे,विष्णू सावंत, आनंदराव जाधव,राजाराम मस्के, रघुनाथ धुमाळ,संजय गुरव,शिवाजीराव चौगुले,तानाजी आटूगडे,शोभा पाटील,सदाशिव गायकवाड, अंजना खांडेकर, हर्षद कदम,प्रदीप सावंत, शिल्पा मस्के, सविता जाधव, मृणाली शेणवी,रुपेश शेणवी , सुनील सुतार, बाजीराव माने,सागर जाधव, भीमराव पाटील ,प्रकाश जाधव  उपस्थित होते. आभार अशोक लोहार यांनी मानले. 

९ टक्के लाभांश, दोन पगार बोनस व कोविड १९ हप्तेवाढ योजनेचा लाभ देणारी जनउत्कर्ष संस्था | Jana Utkarsh Sanstha offering 9% dividend, double salary bonus and Covid 19 installment increase scheme.

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments