BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिखली येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Farmers in Chikhali stopped work on the canal

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 चिखली येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Farmers in Chikhali stopped work on the canal

 चिखली येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Farmers in Chikhali stopped work on the canal

शिराळा: जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई न मिळाल्याने चिखली (ता शिराळा)  येथील शेतकऱ्यांनी  डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. जो पर्यंत मोबदला व नुकसान भरपाई मिळत नाही ,तोपर्यंत काम सुरू करू न देण्याची भूमिका घेतली आहे.

 चिखली येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Farmers in Chikhali stopped work on the canal

      चिखली (ता शिराळा) या गावातून वारणा डावा कालवा जातो,येथील जमिनी बाबत पाटबंधारे विभागा मार्फत ३३  वर्षे भूसंपादन न करता,कालव्याचे खोदकाम केले आहे. . जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई न मिळाल्याने तहसीदार कार्यालय येथे १  फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी  उपोषण  करून आंदोलन केले होते.त्यावेळी  १७ फेब्रुवारी ला प्रांताधिकारी यांची बैठक आयोजित करून तोडगा काढू असे लेखी आश्वासन दिल्या नंतर शेतकऱ्यांनी  उपोषण मागे घेतले होते. त्यांतर १७ फेब्रुवारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्याच्या कोणत्याच मागणीवरती प्रशासनाने समानधारक उत्तर  दिले नाही .याउलट कालव्याचे काम सुरू करण्या बाबत आग्रह करण्यात आला.

 चिखली येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Farmers in Chikhali stopped work on the canal

    आज  चिखली हद्दीमधील कांदे फाटा येथे काम सुरू करण्यासाठी  पाटबंधारे विभागा मार्फत मशीन आणले  असता गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येवून काम सुरु न करण्याची ठेकेदार यांना विनंती केली. आम्हाला   मोबदला व नुकसान भरपाई  मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असे सांगितले. त्यावेळी आम्हाला  वरून आदेश  असल्याने सांगितले सांगितले. मात्र  नंतर   शेतकऱ्याच्या मागणी नुसार  काम बंद केले.

 चिखली येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Farmers in Chikhali stopped work on the canal

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments