BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काळामवाडी (ता. शिराळा) येथील तीन घरांना आग | Three houses in Kalamwadi (Tal. Shirala) caught fire

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

काळामवाडी (ता. शिराळा)  येथील तीन घरांना आग | Three houses in Kalamwadi (Tal. Shirala) caught fire

काळामवाडी (ता. शिराळा)  येथील तीन घरांना आग | Three houses in Kalamwadi (Tal. Shirala) caught fire

काळामवाडी (ता. शिराळा)  येथील  ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर,  शामराव रामचंद्र चिंचवाडकर, संजय  ज्ञानदेव चिंचवाडकर  यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून या आगीत धान्य, कपडे, अंथरूण, पांघरून, रोख रक्कम , फर्निचर,सोने, चांदी, तीन, मोटरसायकल, टायर टूब,  कौले, पिठाची गिरण,इंजिन,शेती औजारे, बैलगाडी असे सर्व मिळून अंदाजे १५ लाखाचे नुकसान झाले आहे.

काळामवाडी (ता. शिराळा)  येथील तीन घरांना आग | Three houses in Kalamwadi (Tal. Shirala) caught fire
 
ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून समजेलेली माहिती अशी, ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर,  शामराव रामचंद्र चिंचवाडकर,  संजय ज्ञानदेव चिंचवाडकर यांचे  ११ खणी चौघईचे घर आहे. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान संजय यांच्या गिरण व मोटरसायकल  गॅरेज असणाऱ्या ठिकाणी  अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. सलग एकच घर असल्याने व दुपारी वाऱ्याचा वेग मोठा असल्याने आग सर्वत्र पसरली. ग्रामस्थांनी प्रसंगावस्थान राखून जनावरांना बाहेर काढले.त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. चिंचवाडकर  कुटुंबियांची कपडे, व इतर साहित्य माडीवर असल्याने ते काढता आले नाही. या आगीत धान्य, कपडे, अंथरूण, पांघरून, रोख रक्कम , फर्निचर,सोने, चांदी, तीन, मोटरसायकल, टायर टूब,  कौले, पिठाची गिरण,इंजिन,शेती औजारे, बैलगाडी असे  सर्व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले.

काळामवाडी (ता. शिराळा)  येथील तीन घरांना आग | Three houses in Kalamwadi (Tal. Shirala) caught fire
 
 ती विझवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी धाव घेतली. गावातील नळपाणी पुरवठा योजना सुरु करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु दुपारी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यामळे किनरेवाडी येथून पाण्याचा टँकर आणला तरी ही पाणी अपुरे पडू लागल्याने निनाई दालमिया कारखान्याने त्यांच्याकडील पाण्याचा टँकर पाठवला. त्यावेळी आग आटोक्यात आली. पण तो पर्यंत सर्व साहित्य जाळून खाक झाले. घटनास्थळी भूषण नाईक, माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील यांनी भेट दिली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी  सरपंच राकेश सुतार, माजी सरपंच सदाशिव नावडे,पोलीस पाटील आकाराम पाटील, संतोष पाटील , आकाश पाटील व गावतील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. या घटनेचा पंचनामा तलाठी जी.व्ही.पाटसुते , सरपंच राकेश सुतार, पोलीस पाटील आकाराम पाटील यांनी केला.

काळामवाडी (ता. शिराळा)  येथील तीन घरांना आग | Three houses in Kalamwadi (Tal. Shirala) caught fire

 ही बातमी आणखी थोड्या वेळात सविस्तर वाचा 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments