रिळे ता. शिराळा येथे अज्ञात चोरट्याने आनंदा लखू पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी काढून रोख रक्कम व सोनं असा ६१ हजार रुपयांचा मुदेमाल लंपास केला.
याबाबत आनंदा लखू पाटील यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीसातून समजलेली माहिती अशी, आनंदा पाटील यांच्या घरातील लोक शनिवारी रात्री आकरा वाजता नेहमी प्रमाणे जेवून झोपले. रविवारी पाहटे पाच वाजता आनंदा हे जागे झाले असता मागील दरवजा उघडा असल्याचे दिसले. त्या नंतर घरातील कपाटातील पाच ग्रामची सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा ६१ हजाराचा ऐवज लंपास झाल्याचे निदर्शनास आले. शेजारी असणाऱ्या शंकर बापू पाटील यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत शिरून झोपलेल्या ठिकाणी उशाला ठेवलेल्या बंडी मधून रक्कम रुपये ४००० रुपये चोरून नेले. पाटील यांच्या घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पळून गेले.
घटनास्थळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांनी भेट दिली. सांगलीहून श्वान पथक येऊन घटनास्थळाची तपासणी केली. यावेळी पोलीस पाटील सुधीर पवार, उपसरपंच बाजीराव सपकाळ ,राजेंद्र पाटील,राजाराम पाटील,जी. एल. पाटील उपस्थित होते. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार शिवाजी पाटील करत आहेत.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments