दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला | The body of a married woman who had been missing for two days was found in a well
दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला | The body of a married woman who had been missing for two days was found in a well शिराळा: मांगले (ता.शिराळा) येथील चांदोली वसाहतीमधील दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या सौ. सुवर्णा विष्णू जाधव (वय वर्षे ४५) यांचा लादेवाडी येथील विहिरीत मृतदेह सापडला.
दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला | The body of a married woman who had been missing for two days was found in a well
याबाबत पती विष्णू बाळू जाधव (वय ४९) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. शिराळा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मयत सुवर्णा ह्या गेल्या दोन दिवसापासून घरातून निघून गेल्या होत्या. त्यांचे पती व मुलगा हे गेल्या दोन दिवसापासून त्यांचा शोध घेत होते.आज शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लादेवाडी हद्दीतील झाकीर सुतार यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला | The body of a married woman who had been missing for two days was found in a well
शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा अहवाल डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी दिला आहे. या घटनेची नोंद शिराळा पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस हावलदार सी.टी. कांबळे हे करीत आहेत.
दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला | The body of a married woman who had been missing for two days was found in a well
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments