इस्लामपुरात केंद्र सरकारचा जाहीर निषेध | Public protest of central government in Islampur
इस्लामपूर:राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना सुड भावनेने अटक करणाऱ्या ईडी व भाजपा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत राज्यातील जनता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुडाचे राजकारण खपवून घेणार नाहीत,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथील कचेरी चौकातील जाहीर निषेध सभेत दिला.
तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,खंडेराव जाधव,माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,माजी उप नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्षा रोझा किणीकर,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,शहराध्यक्ष सचिन कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयराव पाटील म्हणाले,भाजपने सुडाचे राजकारण बंद करावे. ईडीने कारवाई केलेल्यातील किती आरोप सिद्ध झाले. शहाजी पाटील म्हणाले, ही अटक बेकायदेशीर असून मलिक बाहेर आल्यावर आम्ही इस्लामपूर शहरात त्यांचे भव्य स्वागत करू. खंडेराव जाधव म्हणाले, राज्यातील जनता भाजपच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. संजय पाटील म्हणाले,भाजपाने ईडीचा अमर्याद वापर केल्याने राज्यातील जनतेने भाजपला सत्तेतून पाय उतार केले आहे. दादासाहेब पाटील म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात ताकद वाढत असल्याने भाजप ईडीच्या माध्यमातून आपल्या नेत्यांना त्रास देत आहे. मुनीर पटवेकर म्हणाले,आम्ही मलिक यांच्या पाठीशी उभे आहोत. सुस्मिता जाधव म्हणाल्या,किरीट सोमय्या हे ईडीची कोणावर कारवाई होणार? हे अगोदर सांगतात. ईडी भाजपला विकली काय? सुनीता देशमाने म्हणाल्या,भाजपची हिटलरशाही मोडून काढू. देवराज देशमुख म्हणाले,३० वर्षापूर्वीचे जमीन खरेदी प्रकरण उकरून काढून कारवाई करता? मग तुमचे सरकार असताना झोपला होता काय? यावेळी महिला राष्ट्रवादीच्या छाया पाटील, रोझा किणीकर,पदवीधरचे राज्य सरचिटणीस विशाल साळुंखे,युवती सेलचे तालुकाध्यक्षा अंकिता सावंत,शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,सुभाषराव सूर्यवंशी, कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील,मुकुंद कांबळे,बशीर मुल्ला, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष रफिक पठाण,मंजुश्री पाटील,शैलजा जाधव,संजय जाधव,राजवर्धन लाड,सदानंद पाटील,राजेंद्र देसाई,विनायक यादव,शुभम पाटील,जुबेर खाटीक,किरण माने,रणजित तेवरे,अमन मुल्ला यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला,युवक उपस्थित होते.
प्रारंभी युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शकील जमादार यांनी आभार मानले.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments