BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रवादीच्या महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

  राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

शिराळा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सर्व पातळीवर आदर्शवत सुरू असून विशेषतः महिलांचे संघटन व त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक यांनी केले. 

 राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

 

चिखली (ता. शिराळा) येथील चिंतन मंडपात महिला राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत तालुका कार्यकारिणी सदस्य व गाव कमिटीतील महिलांचा स्नेहमेळाव्यात  बोलत होत्या. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुष्मिताताई जाधव, जिल्हा परिषद  सदस्य अश्विनीताई नाईक प्रमुख उपस्थित होत्या. 

 राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement


यावेळी नाईक म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपला पक्ष सदैव कटिबद्ध राहील. महिलांना मुक्त व्यासपीठ मिळावे, यासाठी उत्स्फूर्दपणे वन मिनिट शोअंतर्गत अभिनय, नृत्य, उखाणा, वक्तृत्व, एका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगवणे, संगीत खुर्ची अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

 

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाल्या, प्रत्येक कुटुंबाचा केंद्रबिंदू महिलाच असते. ती संघटित राहिली तर नक्कीच कुटुंबाचा व समाजाचा ही मानबिंदू ठरू शकते. 

 राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

वाळवा तालुकाध्यक्ष सुनिता देशमाने म्हणाल्या, संघटनेचे महत्व सांगत महिलांना मार्गदर्शन केले. संघटित राहून पक्षाचे काम आणखी उठावदार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

 राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

प्रारंभी स्वागत तालुका उपाध्यक्ष हसीना मुल्ला तर, प्रास्ताविक शिराळा तालुकाध्यक्ष साधनाताई पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हाध्यक्ष सौ. जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘‘संवाद गृहिणीशी, कुटुंबाच्या केंद्रबिंदूशी’’ या संकल्पनेचा यावेळी शुभारंभ झाला.  यावेळी उपस्थित कांही महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे बक्षीस वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांना हळदीकुंकू व वाण वाटप करण्यात आले.

 राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement

 

 कार्यक्रमास मनीषाताई नाईक, शुभलक्ष्मी नाईक, आरती नाईक, अंकिता नाईक, माजी सभापती वैशाली माने, वाळवा युवती अध्यक्ष अंकिता सावंत, धोत्रेवाडीच्या सरपंच वनिता माळी, कार्यकारणी सदस्य रंजना पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य स्मिताताई महिंद, वंदनाताई यादव, शिराळा युवती अध्यक्ष शीतल पाटील, शिराळा तालुक्यातून तालुका कार्यकारणी पदाधिकारी, रुपाली नलवडे, ज्येष्ठ कार्यकर्त्या छायाताई पाटील, डॉ सविता नलवडे, वैशाली भुयेकर, कल्पना गायकवाड, नूतन साठे यांच्यासह महिला गाव कमिटी सदस्य आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शैलजाताई काकडे यांनी केले. आभार तालुका कार्यकारणी सरचिटणीस शुभांगी देसाई यांनी मानले.

 राष्ट्रवादीच्या  महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात | NCP women's get-together in excitement



हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments