BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगरुळात दोन वेळा बिबट्याचे दर्शन | Twice a leopard appears in Mangrul

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  मांगरुळात दोन वेळा  बिबट्याचे दर्शन | Twice a leopard appears in Mangrul

 मांगरुळात दोन वेळा  बिबट्याचे दर्शन | Twice a leopard appears in Mangrul

 मांगरुळ (ता. शिराळा ) येथे  रात्री  व सकाळी दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात धास्ती निर्माण झाली आहे. 'श्री चिंचेश्वर' मंदिर परिसरात मानववस्ती असणाऱ्या सर्जेराव बोरगे यांच्या घरच्या शेडलगत असणाऱ्या काही अंतरावर चुलीचे सरपण आणण्यासाठी सकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान गेलेल्या सौ. रुपाली बोरगे यांना बिबट्या दिसताच त्यांनी आरडाओरडा करत धुम ठोकली. लोकांच्या आरडाओरड्याने भांबावलेल्या  बिबट्याने मानवस्तीतील 'मल्हार पेठेतून' नजीकच्या शेतशिवारात धूम ठोकली. 

 मांगरुळात दोन वेळा  बिबट्याचे दर्शन | Twice a leopard appears in Mangrul

       प्रत्यक्षात मानववस्तीतून बिबट्या पळत असल्याचे पाहून अनेकांच्या हदयाची धडधड वाढली होती. परिसरात बिबट्याचे ग्रामस्थांना होणारे दर्शन,हल्ले यामुळे बहुतांशी ग्रामस्थ धास्तावल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री मांगरुळ -चांदोली मुख्य रहदारी रस्त्याच्या खांडेकर-पाटील यांच्या 'सोनार टँक' परिसरात मुख्य रहदारी रसत्यालगत असणाऱ्या दोन्ही 'पिंजरांच्या' होळींमध्ये बिबट्या दबा धरुन बसला होता. त्याचे चारचाकी गाडीमधून छायांकन उद्योजक महेश साळुंखे यांनी केले आहे.

 मांगरुळात दोन वेळा  बिबट्याचे दर्शन | Twice a leopard appears in Mangrul

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments