BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 


असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked


असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked

 ऐतवडे खुर्द: (ता.वाळवा)  येथील  शिवाजी  कोंडीबा पाटील (वय ४५) या शेतकऱ्यावर गव्याने  हल्ला करून त्यास जखमी केले. येलूर पाठोपाठ ऐतवडे येथे गव्याने सलग दुसऱ्या दिवशी हल्ला केल्याने वारणा काठ हादरला आहे.  

असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked
 

ही घटना सकाळी साडे आठ ते नऊच्या वाजण्याच्या  सुमारास घडली.  याबाबत घटनास्थळा वरून समजलेली अधिक माहिती अशी , ऐतवडे खुर्द येथील शेत वस्तीकडे जाणाऱ्या मोळा पाणंद वस्तीवर शिवाजी कोंडीबा पाटील हे जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. नेहमी प्रमाणे उसात वैरण काढत असताना अचानक गव्यानेने पाठी मागून  माडींवर जोरदार धङक दिल्याने ते खाली पङले. त्यात किरकोळ जखमी झाले. त्यांतर त्यांनी आरडाओरडा  करत त्यांनी तिथून पळ काढला.

असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked
 

  थोड्या अंतरावर जाऊन थांबले असता त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकर्यांनी त्यास खासगी दवाखान्यात नेले. त्यानंतर  पोलीस पाटील  मोहन चांदणे  यांनी वन विभागशी संपर्क साधला. त्यानंतर  वन विभागचे पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी  हल्ला झालेल्या शिवाजी पाटील या शेतकऱ्यांची विचारपूस केली.   तो गवा ऐतवडे येथून सूर्यवंशी मळ्याकडे गेला. त्या ठिकाणी त्यास पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यांतर गवा त्या ठिकाणी असणाऱ्या उसाच्य शेतात गायब झाला. या गव्याच्या मागावर वनविभागाचे रैना पाटोळे सचिन कदम, गजानन डोंबाळे, गौरव गायकवाड, कुमार गायकवाड हे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.  

असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked
 

शेतात काम करत असताना काळजी घ्यावी

 वारणा पट्ट्यातील विशेषतः नदीकाठावरील शेतात गव्याचा वावर वाढला आहे. गवा आलेल्या मार्गाने परत निघुन जातो .मात्र काहीजण त्यांच्या मागावर थांबुन ओरङतात. दगङ मारतात त्यामुळे ते बिथरल्या सारखे करतात. प्रसंगी  हल्ला ही करतात. त्यामुळे  शेतकर्यांनी गवा आलेल्या परीसरात एकटे न जाता सोबत आणखी कोणाला तरी घेवून जावे. 

        रैना पाटोळे

वनरक्षक   शिराळा

असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked
 

 ऐतवङे खुर्द परीसरात गव्यांचा  वावर वाढला आहे.  वारणा  नदीकाठावरील शेतात रात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना नेहमी जावे लागते. आज सकाळी झालेला हल्ला नागरिकाच्या सुरक्षिताच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब असुन वन विभागाने गांभिर्याने लक्ष घालून गव्याचा बदोंबस्त करावा. 

     जगन्नाथ सावर्डेकर 

शेतकरी ऐतवङेखुर्द


असा केला गव्याने हल्ला | This is what Gavya attacked

 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments