BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar




शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar
इस्लामपूर येथे सुरु असणाऱ्या जयंत प्रिमियर लीगचे थेट प्रक्षेपण के न्यूज च्या माध्यमातून खास आपल्यासाठी

राष्ट्रवादी पक्षाचे नेते  व माजी कृषिमंत्री शरद पवार व शिराळचे  भाजपाचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची उद्या गुरुवारी सकाळी साडे आकरा  वाजता मुंबई  येथे यशवंतराव  चव्हाण स्मृति सदन मध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांचे मनोनोमिलन होऊन नाईक यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. या बैठकी संदर्भात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला आहे.  शिराळा येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात येणार आहे.

शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar
 

आमदार मानसिंगराव नाईक हे कामानिनित्त मुंबईत असून बुधवारी  दुपारी शिवाजीराव नाईक हे बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व इतर प्रमुख राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. जयंतराव पाटील व शिवाजीराव नाईक यांच्यातील पक्ष प्रवेशाची बोलणी झाली आहे.  या ठोस निर्णयाची अमलबजावणी  व पुढील राजकीय समीकरणांची उजळणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या समोर व्हावी हाच या बैठकीचा हेतू असावा. याच ठिकाणी पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब  होईल.  

शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar

अडचणीत असणाऱ्या संस्थाना उर्जितावस्था आणण्यासाठी राजकारणात दोन पावले मागे जाण्याची तयारी   माजी मंत्री शिवाजीराव नाईक दर्शवली असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या चर्चेला गेले पंधरा दिवस उधान आले आहे. मात्र  राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक हे प्रबळ असताना त्यात शिवाजीराव नाईक यांची भर म्हणजे  एकाच म्यानात दोन तलवारी असे असले तरी हा विधानसभा मतदारसंघ हा मानसिंगराव नाईक यांच्यासाठी सुरक्षित ठेवत मंत्री जयंतराव पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरु  आहे. या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल शिवाजीराव नाईक यांनी दुजोरा दिला नसला तरी नकार  दिलेला नाही.  

शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar
 

मंत्री जयंतराव पाटील व माजी मंत्री शिवाजीराव नाईक या वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या  नागाचा राजकीय झालेला टोकाचा संघर्ष सर्वज्ञात आहे. काही वेळा प्राप्त परिस्थिती नुसार राजकारणात दोन  पाऊल मागे घ्यावे लागते. सध्या शिवाजीराव नाईक यांच्या संस्था अडचणीत असल्याने त्यांना राजकारणा पेक्षा संस्था महत्वाच्या आहेत. राज्यात सरकार महाविकास आघाडीचे व जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक मंत्री जयंतराव पाटील यांच्या हाती आहे. योगायोगाने या बँकेचे अध्यक्षपद हे आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे आहे. संस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या संधीचा फायदा  शिवाजीराव नाईक यांना होणार आहे.   

शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar
 

          

राजकारणासाठी संस्था आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपवर नाराजी व्यक्त न करता आपल्या संस्था व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजीराव नाईक यांना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते आजमावून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यास कार्यकर्त्यांची ही सकारत्मक भूमिका असल्याचे चित्र जाणवत आहे. शिवाजीराव नाईक हाच आमचा पक्ष ही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असल्याने नाईक यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवाजीराव नाईक शरद पवारांच्या भेटीला | Shivajirao Naik to meet Sharad Pawar
 


पक्ष प्रवेशापूर्वी रणधीर नाईक राष्ट्रवादीत सक्रीय 

शिवाजीराव नाईक यांचे चिरंजीव व जिल्हापरिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक हे आठवड्या पासून राष्ट्रवादीच्या  विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावत आहेत. आमदार मानसिंगराव नाईक व त्यांचे चिरंजीव विराज नाईक हे रणधीर नाईक यांच्या हस्ते त्या कामांचा  कुदळ मारून व नारळ फोडून शुभारंभ करत आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांच्या पक्ष प्रवेशा पूर्वीच रणधीर नाईक राष्ट्रवादीत सक्रीय झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments