शिराळा नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत स्वच्छता संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरातील सार्वजनिक विहीर स्वच्छता, जतन व पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने मी गाडगेबाबा अभियान अंतर्गत शहरातील लोहार व कासार गल्ली येथील विहीर परिसर स्वच्छता करण्यात आली.
विहीर व ओढा स्वच्छता उपक्रमातून पारंपारिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परंतु सद्यस्थितीत पूर्णपणे दुर्लक्षिल्या गेलेल्या विहिरी व पाणवठ्यांच्या जतन व सवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहरतील पाणी पुरवठा व्यवस्थेवरील ताण कमी होईल.
यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, मुख्याधिकारी योगेश पाटील, रमेश यादव, रवी यादव नगरपंचायतचे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments