BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign 

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign 

शिराळा : मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातील लोकांपर्यंत पोहचून त्याना शासकीय व इतर वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सेवाभावी वृत्तीने निशुल्क करील, असे प्रतिपादन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले. 

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign 

आज चिखली (ता. शिराळा) येथे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाची सुरूवात व लोगो अनावरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलताना म्हणाले, शिराळा तालुका डोंगराळ व दुर्गम आहे. येथील जनता भोळीभाबडी आहे. सर्व शासकीय यंत्रणापर्यंत पोहोचणे सर्वांना शक्य होत नाही. शासकिय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणेही कठीण अडचणीचे वाटते. त्यामुळे शासनामार्फंत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा माहिती सर्वांपर्यंत पोहोचतेच असे नाही. जरी पोहोचली, तर त्यासाळी लागणारी कागदपत्रे जमा करणे, त्याचा पाठपुरावा करणे अत्यंत जिकिरीचे होते किंवा वाटते. त्यासाठी आम्ही आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाने मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान सुरू करत आहेत. 

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign 

ते म्हणाले, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या तसेच समुह लाभ व सार्वजिनिक लाभाच्या योजना प्रत्येक गावापर्यंत किंबहूना नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम या अभियानामार्फंत केले जाणार आहे. योजना कोणकोणत्या आहेत त्याची माहिती देणे, ज्या त्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्रे मिळविण्यात मदत करणे, अर्ज करून ती योजना मंजूर होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांस मिळवून देण्याचे काम अभियानार्तगत केले जाईल. ज्या पद्धतीने आपल्या शेजारच्या वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांच्या प्रेरणेतून जयंत दारिद्र्य निर्मुलन अभियान राबविले जात आहे, त्या धर्तीवर मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान काम करेल. जेणेकरून तालुक्यातील जनतेचा वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांचा लाभ देता येईल. 

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign 

जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, हे अभियान जस जसा प्रतिसाद मिळेल, तसे त्याची व्याप्ती अधिक व्यापक स्वरूपात करणार आहे. सध्या शिराळा तालुक्यात चार जिल्हा परिषद मतदार संघात चार प्रतिनिधी नेमले आहेत. या प्रतिनिधींना नागरिकांनी संपर्क साधल्यास किंवा संबंधीत प्रतिनिधी आपल्या गावात आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करून नागरिकांनी आपल्या अडचणी सांगाव्यात ते प्रतिनिधी तुम्हाला सर्वती मदत करतील. 

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign 

अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, सुरेश चव्हाण, विश्वास कदम, शिवाजी पाटील, बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, विष्णू पाटील, सुहास पाटील, बाबासाहेब पाटील, आनंदा पाटील, यशवंत निकम, सुकुमार पाटील, दिपक तडाखे व कोंडीबा चौगुले तसेच कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यास सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख आदी उपस्थित होते. 

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाचा शुभारंभ | Launch of Mansinghbhau Public Welfare Campaign 

माहितीसाठी संपर्क साधा:
 मांगले जिल्हा परिषद मतदार संघ : अभिजीत यादव (9834826728),
 वाकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघ : राकेश सवाखंडे (7776066201), 
कोकरूड जिल्हा परिषद मतदार संघ : वैभव गिरीगोसावी (8999980959)
 पणुंब्रे तर्फ वारुण जिल्हा परिषद मतदार संघ : शंकर बोरगे (8600009929). 
या अभियानाचे मुख्य कार्यालय विराज इंडस्टीज, शिराळा आहे. 
मुख्य समन्वय म्हणून उदय पाटील (9860277999) 
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments