पतसंस्थांनी आपले कर्मचारी हे प्रशिक्षित करण्यावर भर देऊन व्यावस्थापनातील उणिवाचा शोध घ्यावा. ग्राहकांना आत्मविश्वास व सुरक्षितता देत कमी नफ्यात जास्त व्यावसाय करून कर्जदारास विमा संरक्षण द्या.जनउत्कर्ष पतसंस्थेमुळे ग्रामीण व दुर्लक्षित भागात अर्थकारणाला बळकटी मिळू लागली असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
शेडगेवाडी (ता शिराळा) येथे जनउत्कर्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या स्थलांतरीत शाखा उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले, पतसंस्थांना गालबोट लागेलेली परिस्थिती असताना बँकेत पतसंस्थांच्या ठेवी जास्त आहे. अनेक व्यावसाईंकांचे व्यावसाय अडचणीत आल्याने बँका पतसंस्थांचे कर्ज बुडाली.. पंरतु शेतकर्यांनी महापूर, अतिवृष्टी, कोरोनाच्या संकटात ही बँका पतसंस्थाची कर्जे वेळेत भरली. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकरी राजाला बँका, पतसंस्थानी उभारी देण्याचे काम करावे. पतसंस्थाचा शाखा विस्तार करताना त्या भागाची माहिती घेऊन शाखा विस्तार करावा.
यावेळी के, वाय भाष्टे यांनी स्वागत तर विजयसिह खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी सोनिया पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव शेडगे, दिनकर शेडगे, रंगराव शेडगे, कुमार कडोले, तानाजी नाटूलकर, विकास शेडगे, सागर नागंरे, संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे, उपाध्यक्षा इंदुताई भाष्टे, संचालक शांताराम जाधव, जनार्धन कांबळे, आनंदराव जाधव,राजाराम मस्के,संजय गुरव,शिवाजीराव चौगुले,ज्ञानदेव पाटील , अंजना खांडेकर, हर्षद कदम,प्रदीप सावंत, शिल्पा मस्के, रुपेश शेणवी, सविता जाधव, मृणाली शेणवी,सुनील सुतार, बाजीराव माने,सागर जाधव, भीमराव पाटील ,प्रकाश जाधव उपस्तित होते. आभार तानाजी आटूगडे यांनी मानले.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments