शिराळा: रणधीर नाईक यांच्या पाठोपाठ माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उद्घाटन कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरवात केल्याने भाजपाच्या शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी प्रवेश पक्का मानला जाता आहे.
पावलेवाडी ता, शिराळा येथील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमास विराज नाईक यांच्या सोबत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावू लागल्या आहेत.
यावेळी नाईक पुढे म्हणाले, जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत ३३ लाख रुपये खर्चाच्या योजने मधून निश्चित गावाचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागेल. गावामध्ये रस्ता करताना अडचण असताना नाल्यावर्ती काँक्रीट करून रस्त्याची लांबी वाढवली असल्याने चांगल्या दर्जाचा रस्ता होत आहे. पावलेवाडी गाव हे उंचावर असलेने याठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने गावातील नागरिकांना त्रास होत होता. परंतु जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सुमारे ३३लाख रुपये मंजूर झालेने गावचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामपंचायतीने गावामध्ये चांगल्या प्रकारे सर्वांना एकत्रित करून विकास कामे मार्गी लावली आहेत.
विराज नाईक म्हणाले, या गावासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे माध्यमातूनजलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून भरीव तरतूद झाल्याने गावचा पाण्याचा कायमचा प्रश्न मार्गी लागत आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलत असून यापुढील काळात ही मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागतील.
स्वागत व प्रस्ताविक एस. एम. पाटील यांनी केले.यावेळी सरपंच शिल्पा पवार,उपसरपंच प्रकाश पावले, गणपती पावले , दाजी पावले, एस. एम. पाटील, अरुण पाटील, माजी सरपंच दिलीप पावले, राजाराम पावले, रिळे सरपंच बाजीराव सपकाळ, यशोदा पावले शिवाजी खोत,तानाजी पावले, नारायण नांगरे, संगीता पावले, अशोक पावले, भीमराव पावले संपतराव पावले उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments