ग्रामसेवक सुवीर पाटील यांचे अपघाती निधन | Accidental death of Gramsevak Suveer Patil
ग्रामसेवक सुवीर पाटील यांचे अपघाती निधन | Accidental death of Gramsevak Suveer Patil
शिराळा :शिराळा खुर्द , शिराळा ) येथील ग्रामसेवक सुवीर नामदेव पाटील (वय ४३ ) यांचे सांगली येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
ग्रामसेवक सुवीर पाटील यांचे अपघाती निधन | Accidental death of Gramsevak Suveer Patil
याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे . रिक्षा चालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत . पोलिसांनी दिलेली माहिती अशी , की सुवीर पाटील यांचे गाव शिराळा खुर्द असून ते फुफिरे ( ता . शिराळा ) येथे ते ग्रामसेवक म्हणून काम करत होते . शनिवारी सकाळी ते सांगलीला कामानिमित्त साडेबाराच्या सुमारास सांगलीवाडीतून बायपास मार्गे येत होते . त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली .
ग्रामसेवक सुवीर पाटील यांचे अपघाती निधन | Accidental death of Gramsevak Suveer Patil
त्यात ते खाली असलेल्या पाईपवर जोरदार आदळले व त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला . त्यांचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान अपघातानंतर रिक्षाचालक पसार झाला . परिसरातील नागरिकांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिली . पोलिस घटनास्थळी दाखल झाले . पोलिस हवालदार दिनकर चव्हाण यांनी प्राथमिक तपास केला . त्यांच्या पश्चाता आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवरी ता, २८ रोजी सकाळी शिराळे खुर्द येथे आहे. .
ग्रामसेवक सुवीर पाटील यांचे अपघाती निधन | Accidental death of Gramsevak Suveer Patil
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments