BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकरुड येथे अपघातात दोन ठार|Two killed in an accident at Kokrud

 कोकरुड येथे अपघातात दोन ठार|Two killed in an accident at Kokrud

 कोकरुड येथे अपघातात दोन ठार|Two killed in an accident at Kokrud

कोकरुड:कोकरुड (ता. शिराळा)  येथे  कोकरूड- नर्ले  पुलाजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने सुमारे ४० फूट उंचीवरून मोटारसायकल खाली पडून  झालेल्या अपघातात आनंदा गजानन पवार (वय ३६) सध्या रा. माळेवाडी (कोकरूड) ता. शिराळा व  नंदलाल झनकलाल ब्राह्मने वय (३४)  चिखली (बुलढाणा) सध्या रा. कोकरूड ता. शिराळा हे दोन जण जागीच ठार झाले आहेत. हे दोघेही सेंट्रीग कामगार आहेत.

 कोकरुड येथे अपघातात दोन ठार|Two killed in an accident at Kokrud

       याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की  नंदलाल ब्राह्मणे याचा मुलगा भेडसगाव (ता. शाहूवाडी)  येथे आश्रम शाळेत शिकण्यासाठी आहे.  त्याला कोकरूड येथे घरी आणण्यासाठी  मोटारसायकल वरून दोघेजण निघाले  होते.  कोकरूड-नर्ले पुलाजवळ गेले असता पुलाच्या मागच्या बाजूस रस्त्याचा  अंदाज न आल्याने  पुलाच्या कठड्याला घासून सुमारे ४० फूट खाली पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.  अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करित आहेत.

 कोकरुड येथे अपघातात दोन ठार|Two killed in an accident at Kokrud

Post a Comment

0 Comments