BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा परिसरात १२ गव्यांचे दर्शन।Darshan of 12 cows in Shirala area

 शिराळा परिसरात १२ गव्यांचे दर्शन।Darshan of 12 cows in Shirala area  

शिराळा परिसरात १२ गव्यांचे दर्शन।Darshan of 12 cows in Shirala area  

शिराळा: शिराळा शहर व परिसरातील गावात  गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज दिवसभरात दोन ठिकाणी १२ गवे दिसल्याने व एका ठिकाणी चार गवे  आत उसात घुसताच आतुन बिबट्या बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिराळा परिसरात १२ गव्यांचे दर्शन।Darshan of 12 cows in Shirala area  

शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे.

     चांदोली राष्ट्रीय उद्याना मध्ये अपेक्षित खाद्य मिळत नसलेने बाहेर मानवीवस्तीत प्राण्यांचा वावर वाढला आहे . बिबटे , माकडं वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे . त्यात आता गव्यांची भर पडली आहे . शिराळा शहरासह तालुक्यात अनेक गावांत महिन्यातून एक वेळ तरी कोणत्या ना कोणत्या गावात पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ला झालेला असतो . माकडं व वानरे पिकांचे नुकसान करीत आहेत . त्यात  या प्राण्यां बरोबरच गव्यांची भर पडली आहे .

शिराळा परिसरात १२ गव्यांचे दर्शन।Darshan of 12 cows in Shirala area  

आज सकाळी साडे सहा ते साडे नऊ पर्यंत जांभळेवाडी च्या नाळ व बामन उगळी परिसरात चार गवे ग्रामस्थांना दिसले.त्या ठिकाणाहून त्यांना लोकांनी सुजयनगर परिसरात हुसकवले.त्या गव्यांच्या मागावर  ग्रामस्थ लक्ष ठेवून असताना  गवे शिंदे यांच्या उसात घुसले असता अचानक उसातून बिबट्या बाहेर आला.त्यामुळे लोकांची धावपळ उडाली. बिबट्या अन् गवा एकाच वेळी या परिसरात वावरत असल्याने लोकांच्या शेतात जाताना भितीचे वातावरण पसरले आहे.

शिराळा परिसरात १२ गव्यांचे दर्शन।Darshan of 12 cows in Shirala area  

भागाईवाडी परिसरात ही आज ८ गव्यांच्या कळपाचे लोकांना दर्शन झाले आहे. या दोन्ही ठिकाणी  वनक्षेत्रपाल सचिन जाधव याच्याे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख,देवकी तसीलदार , हणमंत पाटील , संपत देसाई , बाबा गायकवाड , नामदेव सिद, संभाजी पाटील यांनीभेट देऊनी  पहाणी केली. लोकांनी गव्याला हुसकावण्याचा अथवा दगड मारण्याचा प्रयत्न करू नये ते त्यांच्या मार्गाने निघून जातील याबाबत वन विभागाने परिसरात जागृती करण्यास सुरुवात केली आहे. 

शिराळा परिसरात १२ गव्यांचे दर्शन।Darshan of 12 cows in Shirala area  

Post a Comment

0 Comments