‘आम्ही सांगलीकर’चा अभिमान रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल| We have to work consciously to cultivate the pride of 'Amhi Sanglikar'
‘आम्ही सांगलीकर’चा अभिमान रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल| We have to work consciously to cultivate the pride of 'Amhi Sanglikar'
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळ सांगलीचा वर्धापन दिन संपन्न झाला.
‘आम्ही सांगलीकर’चा अभिमान रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल| We have to work consciously to cultivate the pride of 'Amhi Sanglikar'
कोरोना निर्बंधांमुळे येथील राम मंदीर चौकातील सकाळ कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम झाला. यानिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सांगली @ ६१’ या जिल्ह्याच्या गेल्या साठ वर्षातील वाटचालीचा वेध घेणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
‘आम्ही सांगलीकर’चा अभिमान रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल| We have to work consciously to cultivate the pride of 'Amhi Sanglikar'
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, आम्ही कोल्हापूरकरचा अभिमान जसा रुजला आहे, त्याप्रमाणे आपणास ‘आम्ही सांगलीकर’चा अभिमान रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल. आपले शहर व जिल्हा अधिक समृद्ध व विकसीत करण्यासाठी विशेष मोहिम ‘सकाळ’च्या पुढाकाराने सुरु करूयात. सांगलीला मोठा इतिहास आहे. या जिल्ह्याने शेती आणि दूध उत्पादनातून विकास साधला आहे. तुलनेत औद्योगिक विकास कमी झाला. वायनरीसारखा प्रयोग झाला, मात्र तो फार चालला नाही. ऊस शेती व साखर उद्योगाने मात्र जिल्ह्याची प्रगती झाली.
‘आम्ही सांगलीकर’चा अभिमान रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल| We have to work consciously to cultivate the pride of 'Amhi Sanglikar'
आता सांगलीचा प्रत्येक तालुका राष्ट्रीय महामार्गावर आला आहे. नियोजनबद्ध विकासासाठी ही एक संधी आहे. सर्व घटकांशी जोडल्या गेलेल्या; युवक, महिला, नवउद्योजकांना व्यासपीठ देणाऱ्या ‘सकाळ’ने यात महत्वाची भूमिका बजावावी. शेतकऱ्यांच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावऱ्या दै. ॲग्रोवनने केलेले कार्य सर्वासमोर आहे. शेतकऱ्याला शहाणे करणे प्रशिक्षित करण्याचा, त्यांचे प्रयोग समाजासमोर आणण्याचा ॲग्रोवनचा प्रयत्न राहिला आहे. सकाळच्या सर्वच उपक्रमांच्या पाठीशी आपण सारे राहुया.!! कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील, सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सहयोगी संपादक शेखर जोशी, जाहिरात व्यवास्थापक आनंद शेळके, उदय देशपांडे ,ॲग्रोवनचे व्यवस्थापक शीतल मासाळ आणि सकाळचा सर्व परिवार उपस्थित होता.
‘आम्ही सांगलीकर’चा अभिमान रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल| We have to work consciously to cultivate the pride of 'Amhi Sanglikar'
0 Comments