BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

शिराळा येथील  साई हॉस्पिटलमध्ये अतिशय किचकट असणारी  खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश आली  आहे.  त्यामुळे  सर्वसामान्यांना माफक दरात ही सेवा देणार असल्याचे  प्रतिपादन साई हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शैलेश माने यांनी केले. 

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

    यावेळी बोलताना डॉ.माने म्हणाले, शिराळा  तालुक्यातील माळेवाडी येथील  मदन जाधव यांना खुबा दुखीचा त्रास होता. त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या असता त्यांच्या खुब्यातील हाडांना रक्त पुरवठा होत नसल्याने तेथील हाडांचा गट्टू कुजला असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्याठिकाणी कृत्रिम सांधा बसविणे गरजेचे होते.

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

 जाधव यांना अनेक वर्षांपासून खुबा दुखीचा त्रास होत होता. किरकोळ दुखणे असल्या कारणाने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु सदरचा हा त्रास वाढत गेल्याने त्यांना चालणे, बसणे, तसेच दैनंदिन कामे करताना त्रास होवू लागला. यावेळी त्यांनी बांबवडे, कराड, शाहूवाडी, कोल्हापूर, इस्लामपूर आदीं ठिकाणी या दुखण्याबाबत उपचार सुरू केले. यावेळी त्यांना खुब्यातील हाडाचा गठ्ठू कुजणे (A Vascular Necrosis) यामुळे संबंधित भागाला रक्तपुरवठा  नसल्याने रूग्णास असह्य वेदना होत होत्या.

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

 या दुखण्यावर शस्त्रक्रिया करणे हा एकच पर्याय असल्याचे अनेक ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले होते. तसेच शास्त्रक्रियेचा खर्चही या रूग्णाला न परवडणारा होता. यावेळी  जाधव यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने  आम्ही कमी खर्चात चांगली उपचार पध्दती अवलंबून त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे ते  आता स्वत:ची कामे स्वत: करत आहे. 

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

   यावेळी डॉ. शैलेश माने यांना मिरज येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओंकार कुलकर्णी, भूलतज्ञ डॉ. समृध्दी माने यांनी सहकार्य केले.

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

कमी खर्चात चांगली शस्त्रक्रिया 

मला अनेक दिवसांपासून खुबा दुखण्याचा  त्रास  होता. अनेक मोठ मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी गेलो. डॉक्टरांनी मला शस्त्रक्रियेचाच सल्ला दिला. परंतु ही शस्त्रक्रिया आमच्या परिस्थितीला न परवडणारी होती. परंतु  डॉ. शैलेश माने यांनी मला पूर्णपणे आत्मविश्वास देवून कमी खर्चात चांगली शस्त्रक्रिया करून चांगले उपचार केलेत. आता मला बरं वाटत आहे. माझे दुखणे पूर्णपणे बरे झाले आहे.       

 मदन जाधव, रूग्ण,,

 साई हॉस्पिटलमध्ये खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी| Very successful prosthetic joint implant surgery at Sai Hospital

Post a Comment

0 Comments