बिबट्याच्या हल्य्यात सहा मेंढर ठार. महिन्यात दुसरी घटना|Six sheep were killed by a leopard. The second event of the month
बिबट्याच्या हल्य्यात सहा मेंढर ठार. महिन्यात दुसरी घटना|Six sheep were killed by a leopard. The second event of the month
शिराळा : येथील शिराळा ते एम.आय.डी.सी. रस्त्या लागत असणाऱ्या खंडागळे यांच्या शेतात खेड (ता. शिराळा) येथील सचिन सदाशिव माने, चंद्रकांत भिमराव वगरे, शंकर बापू कोळेकर, जगन्नाथ पांडुरंग शिरतोडे याच्या मेंढराच्या कळपावर दोन बिबट्यानी हल्ला करून सहा मेंढराची कोकर ठार तर सहा जखमी केली आहेत .
बिबट्याच्या हल्य्यात सहा मेंढर ठार. महिन्यात दुसरी घटना|Six sheep were killed by a leopard. The second event of the month
हे ही वाचा -कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २० कोकर ठार तर चार गायब
ही घटना सायंकाळी सुमारे साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक हणमंत पाटील, क्षेत्र सहायक बाबासाहेब गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करून पंचनामा केला. याबाबत समजलेली माहिती अशी, खंडागळे यांच्या शेतात मेंढरांचा कळप बसवला होता. सकाळी मेंढपाळ इतर मेंढर चरावयास नेली होती. तळावर दोन ठिकाणी कोकर लोखंडी जाळीच्या डाली खाली झाकून ठेवली होती. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ चंद्रकांत व सचिन हे दोघे पुढे आले होते. तळावर आले असता दोन बिबटे दोन डाली जवळ कोकरांच्यावर हल्ला करत असल्याचे त्यांनी पहिले..
बिबट्याच्या हल्य्यात सहा मेंढर ठार. महिन्यात दुसरी घटना|Six sheep were killed by a leopard. The second event of the month
त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला असता दोन्ही बिबट्यांनी तिथून पळ काढला. जवळ जाऊन पहिले असता सहा कोकर ठार तर सहा जखमी अवस्थेत आढळून आली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सचिन जाधव आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. त्या नंतर सर्व मेंढर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. यावेळी खेड ग्रामपंचायत सदस्य अविनाश माळी, शशिकांत वगैरे, वैभव माळी, शुभम देशमुख, विश्वजित माळी उपस्थित होते.
बिबट्याच्या हल्य्यात सहा मेंढर ठार. महिन्यात दुसरी घटना|Six sheep were killed by a leopard. The second event of the month
उस क्षेत्राच्या परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे उस परिसरातील शेतकरी,मेंढपाळ,उस तोडणी मजूर यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या बाबत आम्ही शिराळा व वाळवा तालुक्यातील सर्व साखर कारखाने,ग्रामपंचायत, मेंढपाळ, उसतोड मजूर यांना सतर्क रहाण्याबाबत नोटीस दिल्या आहेत.
सचिन जाधव (वनक्षेत्रपाल शिराळा)
एका महिन्यात दुसरी घटना
एक महिन्या पूर्वी कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात रेड येथील सुभाष तुकाराम तांदळे या मेंढपाळाची २० कोकर ठार तर चार गायब झाली होती. आज पुन्हा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे
.
कोण नसताना होत आहेत हल्लेकापरी येथील मेंढपाळ सायंकाळी घरी जेवण आणण्यासाठी गेले असताना पाठीमागे बिबट्याने हल्ला केला.तर आज शिराळा येथे सर्व मेंढपाळ मेंढर चारावयास घेवून गेले असता पाठीमागे हल्ला झाला. खर तर कोकरांच्या संरक्षणासाठी त्या तळावर कोणीतरी असणे गरजेचे आहे. हे या दोन्ही घटनांवरून सिद्ध होत आहे.
बिबट्याच्या हल्य्यात सहा मेंढर ठार. महिन्यात दुसरी घटना|Six sheep were killed by a leopard. The second event of the month
0 Comments