शिराळा: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये जि.प. शाळा रिळेच्या उपशिक्षिका सुरेखा सुभाष नलवडे यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे.त्यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नवोपक्रम स्पर्धेसाठी त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी राबविलेल्या शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती या उपक्रमावर आधारीत : 'तंत्रज्ञानाच्या सुरेख साथीने अध्ययन क्षय भरू गतीने ' हा नवोपक्रम सादर केला होता. सदर उपक्रमाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
सुरेख नलवडे यांनी लोकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांचा अध्ययनामध्ये झालेला अध्ययन क्षय शोधून तो भरून काढण्यासाठी मूलभूत भाषा आणि गणित विकास कार्यक्रमांतर्गत (FLN ) विशेष व्हिडिओ निर्मिती केली होती . त्यांच्या या शैक्षणिक व्हिडिओचा विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी फायदा झाला . आणि या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी मदत झाली.
नवोप्रकासाठी त्यांना डाएटचे प्राचार्य मा. डॉ.रमेश होसकोटी, नवोपक्रम विभाग प्रमुख जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भोई, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, सुनंदा पाटील, केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळे, विषय साधन व्यक्ती मधुकर डवरी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, उपशिक्षिका हसिना पठाण, वंदना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments