विश्वासच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील |Mansingrao Naik as the President of Vishwas and Babasaheb Patil as the Vice President
विश्वासच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील |Mansingrao Naik as the President of Vishwas and Babasaheb Patil as the Vice President
शिराळा: विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्षपदी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संपत खिलारी यांनी काम पाहिले . यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, सहायक उपनिबंधक डी .एस. खत्ताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वासच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील |Mansingrao Naik as the President of Vishwas and Babasaheb Patil as the Vice President
यावेळी नुतन अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याने सभासदांचा विश्वास जपला आहे. पारदर्शी कारभार ,काटकसरीचे नियोजन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सहविजनिर्मिती, डिस्टीलरी प्रकल्प उभारूण शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर देण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. सुरवातीला कारखान्याची गाळप क्षमता २५००टन होती. वाढवून आज ५३०० पर्यंत केली आहे. तर पुढील वर्षी ६००० पर्यंत करणार आहे. नूतन संचालक मंडळ सभासद व ऊस उत्पादक यांच्या विश्वासास पात्र राहून कारखान्यास आणखी उर्जितावस्था आणेल.
विश्वासच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील |Mansingrao Naik as the President of Vishwas and Babasaheb Patil as the Vice President
प्रारंभी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संपत खिलारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नुतन संचालक विराज नाईक, बाबासो पाटील, सुरेश पाटील, विश्वास कदम, राजाराम पाटील, यशवंत निकम, संभाजी पाटील, शिवाजीराव पाटील, विष्णू पाटील, हंबीरराव पाटील, यशवंत दळवी, तुकाराम पाटील, बाळासो पाटील, संदीप तडाखे, कोमल पाटील,अनिता चौगुले, सुहास पाटील, बिरु आंबरे,अजितकुमार पाटील उपस्थित होते.
विश्वासच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील |Mansingrao Naik as the President of Vishwas and Babasaheb Patil as the Vice President
कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.कार्यक्रमास माजी आमदार सत्यजित पाटील, सभापती मनिषा गुरव, अमरसिंह नाईक,राजेंद्रसिंह नाईक, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, दिनकराव पाटील, मानसिंग पाटील, शिवाजीराव घोडे, प्रमोद नाईक , विवेक नाईक, शाहू नाईक, सुरेश चव्हाण, तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वास पाटील, कोंडीबा चौगुले,तानाजी वानरे, उपसभापती बी.के. नायकवडी, टी.एम.साळुंखे, महदेव कदम, अजय जाधव, बाबासाहेब पवार, विजय पाटील, दतात्रय पाटील, विजयराव देशमुख, सचिव सचिन पाटील उपस्थित होते.
विश्वासच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील |Mansingrao Naik as the President of Vishwas and Babasaheb Patil as the Vice President
0 Comments