पत्रकाराचा अवमान करणाऱ्या वनक्षेत्रपालची बदली न केल्यास मनसेचा आंदोलनाच इशारा MNS agitation is a warning if the forest ranger who insulted the journalist is not replaced
पत्रकाराचा अवमान करणाऱ्या वनक्षेत्रपालची बदली न केल्यास मनसेचा आंदोलनाच इशारा MNS agitation is a warning if the forest ranger who insulted the journalist is not replaced
SHIV NEWS
शिव न्यूज
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
वारणावती: येथील वन्यजीव कार्यालयामध्ये वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार गणेश माने यांना वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी अरेरावीची भाषा करत आपल्या कार्यालयातून हाकलून बाहेर काढले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकाराचा अशा पद्धतीने अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याची या कार्यालयातून तत्काळ बदली करण्यात यावी. अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन मनसेचे शिराळा तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीवचे उपसंचालक उत्तम सावंत यांना दिले आहे.
पत्रकाराचा अवमान करणाऱ्या वनक्षेत्रपालची बदली न केल्यास मनसेचा आंदोलनाच इशारा MNS agitation is a warning if the forest ranger who insulted the journalist is not replaced
या निवेदनात म्हटले आहे, पत्रकारास अशा पद्धतीची वागणूक देणारे अधिकारी सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवणार? असल्या अधिकाऱ्याची या कार्यालयातून दहा दिवसांच्या आत बदली करण्यात यावी. अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्यात येईल. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला आपले प्रशासन जबाबदार राहील. निवेदनावर मनसेचे शिराळा तालुकाध्यक्ष संजय पाटील, विशाल सोनवणे, तानाजी थोरात, सागर जाधव यांच्या सह्या आहेत.
पत्रकाराचा अवमान करणाऱ्या वनक्षेत्रपालची बदली न केल्यास मनसेचा आंदोलनाच इशारा MNS agitation is a warning if the forest ranger who insulted the journalist is not replaced
0 Comments