शिराळा :शिराळा उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात कोविड कक्ष सर्व सोयीनियुक्त २४ तास सज्ज ठेवा अशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संर्सगाबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत शिराळा तालुक्यात पुन्हा वाढणारा कोरोनाचा प्रार्दुभाव व त्यावरील उपाया योजनांबाबत प्राथमिक केंद्रवार आढावा घेण्यात आला..यावेळी नाईक म्हणाले, १५ ते १८ वयोगटासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणाचा वेग वाढवा. ज्यांनी दोन लसी पूर्ण केलेल्या नाहीत त्यांची गाववार यादी काढून त्याचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा.
आरोग्य विभाग व पोलिसांनी राज्य शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अधिक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, डॉ.जुबेर मोमिन,डॉ.अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद यांच्यासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
0 Comments