गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil

इस्लामपूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाच्या दर महिन्याला होणाऱ्या गांव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर देश,राज्यासमोरील प्रश्न,आपल्या देशातील विविध विचारधारावर ही वैचारिक मंथन करायला हवे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,जल संपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी केले.
गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil
साखराळे (ता.वाळवा) येथील गांव बैठकीमध्ये बोलत होते . ना.पाटील यांनी खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील व्हर्च्युअल रॅलीत जाहीर केल्याप्रमाणे आज सकाळी साखराळे गावास भेट देत गांव बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,माजी सभापती आनंदराव पाटील,जिल्हा सरचिटणी स बाळासाहेब पाटील,निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,महिला तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,सरपंच बाबुराव पाटील,साखराळे अध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil
यावेळी पाटील म्हणाले,आपल्या पक्षाच्या माध्यमातून गावाची सेवा करणारा प्रत्येक कार्यकर्ता सेवा दलाचा कार्यकर्ता असून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी गांव बैठक व्हायला हवी. आपला पक्ष सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा, जातीयवादी विचार नाकारत धर्मनिरपेक्ष विचार स्विकारणारा,समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा पक्ष आहे. पक्षाच्या व्यासपीठावरून सामान्य माणसाला बोलण्याची संधी दिल्यास पक्षाबद्दल आत्मियता वाढेल.
गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil
गांव बैठकीत वैचारिक मार्गदर्शन करण्यासाठी एखादा वक्ता बोलवावा. उपस्थितांची नोंद ठेवत कोणत्या विषयांची चर्चा झाली याची नोंदही ठेवावी. कोरोनाची संख्या वाढत असल्याने घाबरून न जाता खबरदारी घ्या. कार्यकर्त्यांनी ३१ मार्चपर्यंत क्रियाशील व प्राथमिक सभासद नोंदणी करावी. त्यानंतर निवडणुका घेवून तालुका,जिल्हा,राज्य व देश पातळी वरील पदाधिकारी निवडी केल्या जातील.
गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil
विजयराव पाटील म्हणाले,ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नासह देश व राज्या पुढील प्रश्नांवर चर्चा घडू शकते. भाजपाच्या केंद्र सरकार ने देशात अनेक नव-नवे प्रश्न तयार केले असून त्यावरही विचार मंथन व्हायला हवे.
गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil
आनंदराव पाटील म्हणाले,ना.जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्या पासून पक्षाच्या वाढीत मोलाचे योगदान केलेले आहे.
गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे साखराळे अध्यक्ष अविनाश पाटील,माजी उप सरपंच राजेंद्र पाटील,युवक राष्ट्रवादी चे विनोद बाबर,बूथ अध्यक्ष अर्जुन वीरकर,सुनील पाटील,महिला कार्यकर्त्या शारदा पाटील,लता धज,युवक अध्यक्ष सुशील पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
गाव बैठकामध्ये गावातील प्रश्नांबरोबर वैचारिक मंथन व्हावे- मंत्री जयंतराव पाटील| In the village meeting, there should be an ideological brainstorming with the issues in the village - Minister Jayantrao Patil
प्रारंभी सरपंच बाबुराव पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी बाळासाहेब पाटील,संजय पाटील,सुनीता देशमाने,संग्राम जाधव,शिवाजी डांगे,शैलेंद्र सूर्यवंशी,उपसरपंच तजमुल चौगुले,अलका माने,शशिकांत पाटील,प्रताप पाटील, बाबासाहेब डांगे, रामराजे पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. साखराळे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी आभार मानले. अमोल पाटील यांनी सूत्र संचालन केले.

0 Comments