पत्रकारास अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वनक्षेत्रपाल एन. जे. नलवडे यांच्यावर कारवाईची मागणी| Forest ranger N. j . nalawde insulted the journalist Demand for action against
SHIV NEWS
शिव न्यूज
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
पत्रकारास अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वनक्षेत्रपाल एन. जे. नलवडे यांच्यावर कारवाईची मागणी| Forest ranger N. j . nalawde insulted the journalist Demand for action against
वारणावती : वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारास वनक्षेत्रपाल एन. जे. नलवडे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी पत्रकारांच्यावतीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीवचे उपसंचालक उत्तम सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रकारास अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वनक्षेत्रपाल एन. जे. नलवडे यांच्यावर कारवाईची मागणी| Forest ranger N. j . nalawde insulted the journalist Demand for action against
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वारणावती येथील कार्यालयामध्ये मणदूर व इतर वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ हे वन्यजीवशी सबंधित असलेल्या विविध अडचणीचे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी वार्तांकनासाठी दै. केसरीचे पत्रकार गणेश माने हेही ग्रामस्थांसोबत गेले होते. ते निवेदन देतानाचा फोटो मोबाईलवर काढत असताना वनक्षेत्रपाल नलवडे यांनी माने यांच्याकडे ओळखपत्र दाखविण्याची मागणी केली. त्यांनी ओळखपत्र दाखविल्यानंतरही नलवडे यांनी माने यांना अरेरावीची भाषा करत आपल्या कार्यालयातून हाकलून दिले. एका अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातून एका पत्रकारास अशा पद्धतीने हाकलून बाहेर काढणे हे लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेचा अवमान करणारे आहे. संबधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.
पत्रकारास अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वनक्षेत्रपाल एन. जे. नलवडे यांच्यावर कारवाईची मागणी| Forest ranger N. j . nalawde insulted the journalist Demand for action against
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शाहुवाडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे, मराठी पत्रकार संघाचे शिराळा तालुकाध्यक्ष भरत गुंडगे, उपाध्यक्ष हिंदूराव पाटील, एन. जी. पाटील, बजरंग पाटील, अनिल झाडे, शिवाजी कुंभार, आनंदा सुतार, गणेश माने, बिपीन पाटील, बालेखान डांगे, याकूब मुजावर, नारायण घोडे, सुरेश पवार यांच्या सह्या आहेत.
पत्रकारास अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वनक्षेत्रपाल एन. जे. नलवडे यांच्यावर कारवाईची मागणी| Forest ranger N. j . nalawde insulted the journalist Demand for action against
0 Comments