BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खास. धैर्यशील माने.| Chandoli will be introduced to the world in a new form as 'Amazing Chandoli' - mp Dairyshil mane

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
 
चांदोलीचा परिसराचे निसर्ग सौंदर्य  हेच आपले  सर्वात मोठे वैभव आहे. ते  जगाच्यासमोर येणे ही काळाची गरज आहे. यापुढे चांदोलीला 'अमेझींग चांदोली' म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा मानस असल्याचे  मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.

 चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खास. धैर्यशील माने.| Chandoli will be introduced to the world in a new form as 'Amazing Chandoli' -  mp Dairyshil mane 

वारणावती (ता. शिराळा ) येथे वन सभागृहात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

 चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खास. धैर्यशील माने.| Chandoli will be introduced to the world in a new form as 'Amazing Chandoli' -  mp Dairyshil mane 

यावेळी  खासदार माने म्हणाले, चांदोली परिसर विकसीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करावा. पर्यटन क्षेत्र व व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात मोठी संधी असलेले  हे क्षेत्र आहे. ते  पर्यटकांसमोर येण्यासाठी त्याचा कालबध्द विकास होणे ही काळाची गरज आहे. हे  पर्यटन क्षेत्र लोकल ते ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांदोली अभयारण्यातील जैवविविधता, निसर्ग सौंदर्य, दुर्मिळ प्राणी, पक्षी जगासमोर यावे यासाठी टप्याटप्याने याचा विकास व्हावा यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. त्यानुसार राज्य शासनाने याबाबतचा सविस्तर प्रस्ताव मागविला आहे. चांदोलीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील १० वर्षातील गरजा लक्षात घेवून  व आसपासचा परिसर ही सुधारावा  यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव तयार करावेत.

 चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खास. धैर्यशील माने.| Chandoli will be introduced to the world in a new form as 'Amazing Chandoli' -  mp Dairyshil mane 

 चांदोली पर्यटन क्षेत्र जागतिक स्तरावर डेव्हलप झाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे सांगली जिल्हा जागतिक स्तरावर पोहोचेल व पर्यटनाच्या माध्यमातून शासनालाही आर्थिक फायदा होईल. त्यासाठी वन व वन्यजीव विभागाने चांदोली ब्रँड विकसीत करावा. या बैठकीत वन विभाग,वन्यजीव विभाग, बांधकाम विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, यांनी चांदोली पर्यटन विकासाबाबतचे थोडक्यात सादरीकरण केले.

 चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खास. धैर्यशील माने.| Chandoli will be introduced to the world in a new form as 'Amazing Chandoli' -  mp Dairyshil mane 

विनायक गायकवाड यांनी  स्वागत प्रास्ताविक केले.यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, सुखदेव पाटील, हणमंतराव पाटील, सरपंच वसंत पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, राजीव पाटील, सुमित साळुंखे, सागर जाधव, अर्जुन बिराजदार सुयोग पाटील, विजयसिंह देसाई, निलेश आवटे, आकाश पाटील  उपस्थित होते.   आभार वनपाल जयसिंग महाडिक यांनी मानले. 

 चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खास. धैर्यशील माने.| Chandoli will be introduced to the world in a new form as 'Amazing Chandoli' -  mp Dairyshil mane 

 चांदोलीच्या इतिहासात प्रथमच यू ट्यूब, फेसबुक पेज, रिल्स, जर्सी आदींच्या माध्यमातून चांदोली मधील विविधता आता टप्याटप्याने जगासमोर आणण्यासाठी खासदार माने यांच्या हस्ते  'अमेझींग चांदोली' या  यू ट्यूब, फेसबुक पेज, रिल्स, जर्सी यांचा शुभारंभ करण्यात आला.

 चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खास. धैर्यशील माने.| Chandoli will be introduced to the world in a new form as 'Amazing Chandoli' -  mp Dairyshil mane 

Post a Comment

0 Comments