शिराळ्यात १२ ठिकाणी सी.सी.टी.व्ही. |CCTV at 12 places in Shirala
शिराळ्यात १२ ठिकाणी सी.सी.टी.व्ही. |CCTV at 12 places in Shirala
शिराळा: शिराळा शहरातील नागरीकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काळजी घेण्यासाठी शहर सी.सी. टी.व्ही. युक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून २७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
शिराळ्यात १२ ठिकाणी सी.सी.टी.व्ही. |CCTV at 12 places in Shirala
ते म्हणाले, मंजूर झालेल्या निधीतून शिराळा शहर हद्दीत १२ ठिकाणी सी. सी. टिव्हीची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येईल. त्यामध्ये आय.टी.आय. चौक २ बुलेट कॅमेरा व २ ए. एन. पी. आर. कॅमेरा, कापरी नाका २ बुलेट कॅमेरा व १ ए.एन. पी. आर. कॅमेरा, लक्ष्मी चौक ३ बुलेट कॅमेरा, कोकरूड नाका येथे ३ बुलेट कॅमेरा व १ ए.एन. पी. आर. कॅमेरा, आंबामाता मंदीर २ बुलेट कॅमेरा, मरीमी चौक २ बुलेट कॅमेरा, १ पी.टी.झेड कॅमेरा व १ पी.ए. सिस्टीम, पाडळी रोड तळीचा कोपरा १ बुलेट कॅमेरा,
शिराळ्यात १२ ठिकाणी सी.सी.टी.व्ही. |CCTV at 12 places in Shirala
होळीचा टेक- २ बुलेट कॅमेरा, पुजा मेडीकल गुरूवार पेठ ३ बुलेट कॅमेरा, तोरणा भूईकोट किल्ल्याजवळील पूल १ बुलेट कॅमेरा, पोटे चौक २ बुलेट कॅमेरा व १ पी.ए. सिस्टीम, नगरपंचायत चौक २ बुलेट कॅमेरा) सीसीटीव्ही सव्हिलन्स यंत्रणा बसविणे. अशा पद्धतीने यंत्रणा कार्यान्वीत होईल. शहरातील नागरीकांची सातत्याने असणारी मागणी पूर्ण केली आहे. ही यंत्रणा कार्यान्वीत झाल्यावर शहरात होणार्या चोर्या, वाहतूक नियंत्रण आदी गोष्टीवर नियंत्रण करणे शक्य होईल. शिराळा शहराच्या विकासासाठी सातत्याने माझे प्रयत्न आहे. शिराळ्यात १२ ठिकाणी सी.सी.टी.व्ही. |CCTV at 12 places in Shirala
गीत
0 Comments