BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पारायण सोहळा संपवून घरी जाणाऱ्या प्रल्हाद महराजांचा अपघाती मृत्यू |Accidental death of Pralhad Maharaj on his way home after the Parayan ceremony

 कुरळप: पारायण सोहळ्याच्या  सांगता समारंभा नंतर घरी परत जात असताना कोरेगाव (ता . वाळवा ) येथील ह.भ.प.  प्रल्हाद शंकर पाटील महाराज यांचे अपघाती  निधन झाले. 

पारायण सोहळा संपवून घरी जाणाऱ्या प्रल्हाद महराजांचा अपघाती मृत्यू |Accidental death of Pralhad Maharaj on his way home after the Parayan ceremony

 याबाबत संदीप तुकाराम आलुगडे रा . भाटशिरगाव (ता.शिराळा) यांनी कुरळप पोलिसात फिर्याद  दिली आहे. संशयित टॅक्टर चालक श्रीकांत रामचंद्र पाटील रा . ऐतवडे खुर्द याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे . ह.भ.प. प्रल्हाद पाटील यांच्या अपघाताची माहिती कळताच  कोरेगाव व इतर  ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली . त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे .

पारायण सोहळा संपवून घरी जाणाऱ्या प्रल्हाद महराजांचा अपघाती मृत्यू |Accidental death of Pralhad Maharaj on his way home after the Parayan ceremony

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , भाटशिरगाव (ता . शिराळा)  या ठिकाणी आठवडाभर पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता . या पारायण सोहळ्यासाठी कोरेगावचे  प्रल्हाद पाटील हे आठवडाभर गावातच राहून पारायण करत होते. पारायणाचा  सांगता सोहळा आटोपून पाटील हे भाटशिरगाव येथील संदीप तुकाराम आलुगडे यांच्या दुचाकी वरून  सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान बाहेर पडले . मांगले चिकूर्डे मार्गे ऐतवडे खुर्द मधून कुंडलवाडीला जाणाऱ्या रस्त्यावरून साडेसातच्या सुमारास जात असताना समोर उसाने भरलेला टॅक्टर व ट्राली जात असल्याने दुचाकीचा वेग कमी केला . दरम्यान पाठीमागून येणाऱ्या टॅक्टर ने जोराची धडक दिली .

पारायण सोहळा संपवून घरी जाणाऱ्या प्रल्हाद महराजांचा अपघाती मृत्यू |Accidental death of Pralhad Maharaj on his way home after the Parayan ceremony

या धडकेत प्रल्हाद पाटील हे टॅक्टर व ट्रालीच्या चाकाखाली सापडले . यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.दुचाकीचालक संदीप यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली . यानंतर टॅक्टर चालकाने टॅक्टर ट्राली जागेवरच सोडून पलायन केले. याबाबत  कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  अधिक तपास एस . पी . जाधव करत आहेत.

पारायण सोहळा संपवून घरी जाणाऱ्या प्रल्हाद महराजांचा अपघाती मृत्यू |Accidental death of Pralhad Maharaj on his way home after the Parayan ceremony

Post a Comment

0 Comments