BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वासच्या कामगारांना १२ टक्के पगारवाढ| 12 per cent pay hike for vishwas workers

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 

विश्वासच्या कामगारांना  १२  टक्के पगारवाढ| 12 per cent pay hike for vishwas workers



विश्वासच्या कामगारांना  १२  टक्के पगारवाढ| 12 per cent pay hike for vishwas workers


शिराळा : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यांच्या सर्व कायम व हंगामी कामगारांना त्रिपक्षीय समितीने सूचविलेली १२  टक्के पगारवाढ व आवश्यकती पदोन्नती १  जानेवारी २०२२  पासून लागू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. 

विश्वासच्या कामगारांना  १२  टक्के पगारवाढ| 12 per cent pay hike for vishwas workers

 

 कारखान्याचे माजी अध्यक्ष, लोकतेने स्व. फत्तेसिंगराव नाईक व स्व. लिलावती नाईक यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने आमदार नाईक यांनी ही घोषणा केल्याने सर्व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले होते.  कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, संचालक विराज नाईक उपस्थित होते. 

विश्वासच्या कामगारांना  १२  टक्के पगारवाढ| 12 per cent pay hike for vishwas workers

 

यावेळी  नाईक म्हणाले, राज्य शासन, साखर कारखाने व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींच्या त्रिपक्षीय समितीने ४  ऑक्टोबर २०२१  रोजी राज्यातील साखर कामगारांना १  एप्रिल २०१९  पासून १२  टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय जाहिर केला आहे.  विश्चासराव नाईक सहाकरी साखर कारखान्यातील अधिकारी, कायम, हंगामी कायम व हंगामी कर्मचाऱ्यांना १  जानेवारी २०२२  पासून ही पगारवाढीसह आवश्यक पदोन्नतीही लागू केली आहे. हा निर्णय संचालक मंडळ व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी सर्वसंमतीने घेतला आहे. 

विश्वासच्या कामगारांना  १२  टक्के पगारवाढ| 12 per cent pay hike for vishwas workers

 

ते म्हणाले, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांनी शिराळा व शाहूवाडी तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी विश्वासराव नाईक कारखान्याच्या माध्यमातून शास्वत जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात पाणी योजना राबवून हरीतक्रांती घडवली. सर्वसामान्य मानसाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले. कर्मचाऱ्यांना वेळच्यावेळी पगार देवून त्याच्या कुटुंबाला मजबूत बनवले. त्यांना आपले कुटुंब मानले. सातत्याने संचालक मंडळाचे शेतकरी, सभासद व कर्मचारी हिताचे निर्णय घेतले. यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ व कामागार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

विश्वासच्या कामगारांना  १२  टक्के पगारवाढ| 12 per cent pay hike for vishwas workers



Post a Comment

0 Comments