शिराळा: उपवळे - कदमवाडी ( ता.शिराळा ) येथील शिराळा जाण्यासाठीचा कच्चा रस्ता वारंवार मागणी करून ही दुरुस्त न केल्याने संतप्त नागरिकांनी मोरणा धरणातून पाणी सोडण्यास कर्मचाऱ्याना अटकाव केला होता. शेतकऱ्यांची मागणी बरोबर असल्याने अधिकाऱ्यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने मोरणा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.
अतिवृष्टीमुळे मोरणा धरणाजवळील नदी पत्रातील शिराळा गावास जोडणारा रस्ता वाहून गेला होता. या गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना हा रस्ता नसल्याने ७ ते ८ किलोमीटर फिरून दूरचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे येथील नागरिकांनी याबाबत वारंवार संबंधित अधिकारी यांना लेखी व तोंडी कल्पना दिली होती. हा रस्ता न झाल्यास धरणातून पाणी सोडू देणार नाही असा इशारा दिला होता. पण त्यावर कोणती ही कार्यवाही न झाल्याने मंगळवारी अधिकारी धरणातील पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना नागरिकांनी गेट उघडू दिले नाही. जो पर्यंत आमच्या मागणीचा विचार होत नाही तो पर्यंत धरणातून पाणी न सोडण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.त्यामुळे शेतकर्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अधिकार्यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे व नदी पात्रता सिमेंटच्या पाईप टाकून तात्पुरती सोय करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे नागरिकांनी धरणातून पाणी सोडण्यास मान्यता दिली.
यावेळी सह्याद्री खरेदी विक्री संघाचे संचालक प्रदीप कदम,शेतकरी संघटनेचे शिराळा तालुका अध्यक्ष उत्तम कदम, संजय कदम , बाबासाहेब कदम, उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे, स्थापत्य अभियंता एस,के.पाटील, मोजणीदार मोहन कदम, कालवा निरीक्षक अनिल पाटील,सुनील पायमल,साईनाथ पाटील उपस्थित होते.
जवळच्या रस्त्या अभावी शाळेय विध्यार्थी व वयोवृद्ध लोकांची होणारी पायपीट लक्षात घेवून यावर लवकरच तोडगा काढण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा झाली. त्या नुसार रस्त्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे मोरणा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
लालासाहेब मोरे उपविभागीय अभियंता
0 Comments