विश्वास कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवू -रणजितसिंह नाईक |We will fight the election of Vishwas Karkhana vigorously - Ranjit Singh Naik
विश्वास कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवू -रणजितसिंह नाईक |We will fight the election of Vishwas Karkhana vigorously - Ranjit Singh Naik
विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सभासद व कामगारांच्या सन्मानासाठी ताकदीने लढवणार असल्याचे मत रणजितसिंह नाईक यांनी व्यक्त केले.
विश्वास कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवू -रणजितसिंह नाईक |We will fight the election of Vishwas Karkhana vigorously - Ranjit Singh Naik
शिराळा येथे त्यांच्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी नाईक म्हणाले, शिराळा- शाहूवाडी तालुक्याच्या डोंगरी भागातील गरीब शेतकऱ्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी कारखान्याची उभारणी स्वर्गीय विश्वासराव नाईक भाऊ यांनी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या मदतीने व सहकार्याने केली. कारखाना उभारणी दरम्यानच विश्वासभाऊंचे अपघाती निधन झाले. कारखान्याच्या उभारणीमध्ये माजी आमदार कै . वसंतराव नाईक, स्वर्गीय फत्तेसिंग नाईक, दिवंगत माजी मंत्री व सभापती शिवाजीराव देशमुख यांनी योगदान दिले आहे. संस्थेला उर्जित अवस्था आणण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी मोलाची मदत केली. कारखाना पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी खासदार कै.उदयसिंह गायकवाड व हिंदकेसरी कै. गणपतराव आंदळकर यांनी मोठे सहकार्य व मदत केली.
विश्वास कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवू -रणजितसिंह नाईक |We will fight the election of Vishwas Karkhana vigorously - Ranjit Singh Naik
सन २००० पर्यंत कारखान्याकडून कै. आप्पांच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या साथीने व सहकार्याने ऊस उत्पादकाचे व कामगारांचे हित जोपासण्याचे काम केले. त्यानंतर मात्र सभासद, ऊस उत्पादक व कामगार यांचा विचार न करता कारभार चालवला जात आहे. २०१६ मध्ये हा कारखाना खासगीकरण्याचा देखील त्यांनी घाट घातला होता. याला आम्ही विरोध केल्याने खाजगीकरणाचा प्रयत्न थांबला. याच मुद्द्यावर आम्ही बाहेर पडलो. आता सभासद, ऊस उत्पादक, कामगार या सर्वांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
विश्वास कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवू -रणजितसिंह नाईक |We will fight the election of Vishwas Karkhana vigorously - Ranjit Singh Naik
यावेळी नगरसेवक अभिजितसिंह नाईक, विक्रमसिंह नाईक, जिल्हा परिषद माजी सभापती सौ. वैशाली नाईक, श्रीमती शोभाताई नाईक, सौ. दुर्गादेवी नाईक, शक्ती पाटील उपस्थित होते.
विश्वास कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवू -रणजितसिंह नाईक |We will fight the election of Vishwas Karkhana vigorously - Ranjit Singh Naik
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments