शिराळा: विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. यावेळी ही परंपरा कायम राखण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव नाईक व जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित देशमुख आणि ज्यांनी अर्ज मागे घेतले त्या सर्वांनी यांचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
चिखली (ता. शिराळा) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी नाईक म्हणाले, कारखान्याने नेहमीच शेतकरी व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. पारदर्शक कारभार व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसा योग्य दर दिला आहे. सुरवातीला कारखान्याची गळीत क्षमता २५००टन होती. ५२००पर्यंत करून पुढील वर्षी ६००० पर्यंत करणार आहे. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील,राजेंद्र नाईक, हंबीरराव पाटील उपस्थित होते.
नुतन संचालक मंडळ गटवार, आरक्षण निहाय असे :
मतदार संघ क्र १: गट नं. १ (चिखली जागा २) : विराज मानसिंगराव नाईक (चिखली) व बाबासो केशव पाटील (सागाव) . मतदार संघ क्र १ : गट नं. २ (मांगले जागा २) : सुरेश पांडुरंग पाटील (मांगले) व मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक (चिखली) .मतदार संघ क्र १ : गट नं. ३ : (शिराळा जागा 3) : विश्वास बळवंत कदम (शिराळा), राजाराम शामराव पाटील (वाकुर्डे खुर्द) व यशवंत पांडुरंग निकम (शिराळा). मतदार संघ क्र १ : गट नं. ४ (कोकरूड जागा ३) : संभाजी बाळू पाटील (काळुंद्रे), शिवाजीराव वसंत पाटील (पणुंब्रे तर्फ वारुण) व विष्णू महादेव पाटील (बिळाशी).
मतदार संघ क्र १ : नं. ५ (सरूड जागा २) : बाबासाहेब यशवंतराव पाटील (सरूड, ता. शाहुवाडी) व अजितकुमार सदाशिव पाटील (चरण) .मतदार संघ क्र १ : गट नं. ६ (भेडसगाव जागा ३) : हंबीरराव केशवराव पाटील (भेडसगाव, ता. शाहुवाडी), यशवंत दादू दळवी (मालेवाडी, ता. शाहुवाडी) व तुकाराम पांडुरंग पाटील (पुसाले, ता. शाहुवाडी). मतदार संघ क्र २ : संस्था गट (जागा १) : बाळासो ज्ञानू पाटील (पाडळेवाडी). मतदार संघ क्र ३ : अनुसूचिती जाती किंवा जमाती (जागा १) : संदीप दिनकर तडाखे (मांगले) .मतदार संघ क्र ४: महिला गट (जागा २) : कोमल विश्वास पाटील (बांबवडे) व अनिता कोंडीबा चौगुले (आरळा). मतदार संघ क्र ५ : इतर मागासर्गीय (जागा १) : सुहास शिवाजीराव पाटील (कोकरूड).मतदार संघ क्र ६ : भटक्या जाती व विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग (जागा १) : बिरु सावळा आंबरे (पुनवत).
0 Comments