शिराळा:शिराळा सारख्या डोंगरी तालुक्यातील ग्रामीण भागामधील अनेक विद्यार्थी संघर्ष करून विविध स्पर्धेमध्ये राज्यपातळीवर चमकताना दिसत आहेत. हे तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथील कन्या शाळेची विद्यार्थिनी समीक्षा माणिक जाधव हिची भारतीय कुस्ती महासंघाचेवतीने झारखंड येथे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी देशमुख पुढे म्हणाले. शिराळा तालुक्याचा डोंगरी विभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी कै. शिवाजीराव देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे आज सर्व विद्यार्थ्यांना असो की विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी तालुक्यामध्ये मंजूर करण्यासाठी उपयोग होत आहे. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुका, जिल्हा , राज्य व देश पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रात चमकताना दिसत आहे .याचा आज आम्हा मंडळींना रास्त अभिमान आहे.
तालुक्यातील औंंढी सारख्या छोट्या गावातील समीक्षाची भारतीय कुस्ती महासंघाचेवतीने झारखंड येथे पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय कृषी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याकडून औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धे मध्ये ३३ किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही शिराळा तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी गोष्ट आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य के. डी.पाटील,प्रदीप कदम, शिवाजी पाटील, प्रवीण जाधव, सुहास पाटील, शिवाजी पाटील, धनाजी जाधव, शिवराज देसाई, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments