BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयास टाळे| lock the office of the group education officer

 गटशिक्षण अधिकारी  यांच्या कार्यालयास टाळे| lock the office of the group education officer

 गटशिक्षण अधिकारी  यांच्या कार्यालयास टाळे| lock the office of the group education officer

शिराळा :शिराळा पंचायत समितीतीच्या  सर्व शिक्षण अभियान विभागातील सर्व रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी गटशिक्षण अधिकारी  यांच्या कार्यालयास टाळे ठोकून  व पंचायत समिती गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले.

 गटशिक्षण अधिकारी  यांच्या कार्यालयास टाळे| lock the office of the group education officer

     शिक्षण विभागातील रिक्त जागा भरण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून सातत्याने केली जात आहे.. डिसेंबर महिन्यामध्ये तीन वेळा सातत्याने निवेदन व अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करून देखील या विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी कोणतीही कारवाई संबंधित विभागाकडून झाली नाही.

 गटशिक्षण अधिकारी  यांच्या कार्यालयास टाळे| lock the office of the group education officer

     यावेळी रणधीर नाईक म्हणाले,"शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे.  या तालुक्यातील  शासकीय कार्यालयातील रिक्त जागा भराव्या  अशी मागणी आम्ही सातत्याने करत आलो आहोत. सर्व शिक्षा अभियानच्या   रिक्त जागा भरण्यात याव्यात .त्यामुळे  येथील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल .त्यांची गैरसोय होणार नाही. गुणवत्ता वाढीस मदत होईल अशी भूमिका घेऊन सातत्याने संबंधित विभागांशी पाठपुरावा करत होतो.परंतु त्यांच्याकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे.

 गटशिक्षण अधिकारी  यांच्या कार्यालयास टाळे| lock the office of the group education officer

 मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  कर्मचारी भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी नगरसेवक बंडा डागे, वैभव गायकवाड, सम्राट शिंदे,उपसरपंच धनाजी नरुटे,विजय महाडीक, दीपक पाटील, प्रदीप कदम,मोहन पाटील , सत्यवान पाटील, रमेश पाटील, रणजीत कदम,पांडुरंग पाटील, बबलू शेळके,राजेंद्र पाटील,कुलदीप निकम,अभिजित शेंणेकर,विलास एटम, संभाजी पाटील, आनंदराव पाटील, तानाजी पाटील, नरेश पाटील,नामदेव पाटील,नागेश नलवडे, अर्जुन पाटील उपस्थित  होते.

 गटशिक्षण अधिकारी  यांच्या कार्यालयास टाळे| lock the office of the group education officer

Post a Comment

0 Comments