जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
कासेगाव: शासनाच्या नवीन योजना सुरू करण्यापेक्षा आहेत त्या योजना अधिक सक्षमपणे समाजातील गोर-गरीब,सर्व सामान्य माणसांच्यापर्यंत पोचवूया.जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री,जयंतराव पाटील केले.
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
कासेगाव (ता.वाळवा) येथील पदयात्री स्मारकामध्ये तहसिल कार्यालयामार्फत महा राजस्व अभियान अंतर्गत आयोजित विस्तारित समाधान मेळाव्यात बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी डॉ.आबासो पवार, कृषी अधिकारी भगवान माने, सभापती शुभांगी पाटील,उपसभापती नेताजीराव पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, जि.प.सदस्या संगीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी १५७८ लाभार्थींना वेग-वेगळ्या लाभांच्या पत्रे वाटप करण्यात आले.
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
यावेळी पाटील म्हणाले, वीज मंडळाच्या तक्रारी सोडविण्यासाठी येत्या एक-दोन आठवडय़ात इस्लामपूर येथे समाधान मेळावा घेणार आहे. शाळेत जातीचे दाखले देत आहोत. आता त्याच्या पुढे जाऊन जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाळवा तालुक्यातील सुशिक्षित तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. त्याच्या मालास हक्काची बाजार पेठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिला बचत गटांना आपण सातत्याने प्रोत्साहन देत आहोत.
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
आमदार नाईक म्हणाले, ना.पाटील यांच्या प्रयत्नांतून सध्या शाळेतच दाखले दिले जात असल्याने पालकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टळला जात आहे. ते सध्या बचत गटांना प्रोत्साहन देत जिल्ह्याचे आरोग्याच्या व्यवस्था सक्षम करीत आहेत. वाकुर्डे बु: योजना नं १ व २ ला गती देत राष्ट्रीय महामार्गाचा पली कडील जमिनीसही पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
देवराज पाटील म्हणाले,रस्ते,पूल आदी सार्वजनिक कामे होतच रहातात. सध्या साहेबांच्या प्रयत्नाने छोट्या-छोट्या योजना सामान्य माणसांच्यापर्यंत पोचविल्या जात असल्याने त्यांच्यात समाधान निर्माण होत आहे. वीज मंडळाबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत,आपण त्यात लक्ष घालावे.
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
यावेळी सौ.शुभांगी पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. ना.पाटील,आम.नाईक यांनी महिला बचत गटाच्या तसेच आरोग्य विभागाच्या स्टॉलला भेट देवून त्यांचे कौतुक केले.
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
प्रारंभी प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी रविंद्रकाका बर्डे,नेताजीराव पाटील,बाळासाहेब पाटील,सौ.सुनीता देशमाने,लिंबाजी पाटील,रणजित पाटील, सरपंच किरण पाटील,अजिंक्य कुंभार,सीमा सोनवणे यांच्यासह कासेगाव व परिसरातील सरपंच,पदाधिकारी,बचत गटाच्या महिला, शासकीय अधिकारी,कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी आभार मानले.प्रा.कृष्णा मंडले, राजेश चव्हाण यांनी सूत्र संचालन केले.
जात पडताळणीचे दाखले शाळा,कॉलेजमध्ये देण्याचा प्रयत्न |Attempt to issue caste verification certificates in schools and colleges
0 Comments