अवकाळीचा रब्बी पिकांना दणका | Untimely rains hit rabi crops
अवकाळीचा रब्बी पिकांना दणका | Untimely rains hit rabi crops
कापरी. (ता.-शिराळा) येथे दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये रब्बी ज्वारी,हरभरा, गहू,तसेच भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अवकाळीचा रब्बी पिकांना दणका | Untimely rains hit rabi crops
यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच नुकसान झाले होते. शेतातील माती देखिल वाहुन गेली होती. या नुकसानीतुन शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा दुहेरी संकट ऊभे राहिले आहे.
अवकाळीचा रब्बी पिकांना दणका | Untimely rains hit rabi crops
या वर्षी परतीचा मान्सून पाऊस चांगला झाल्यामुळे जमिनीत रब्बी पिक पेरणीस उपयुक्त ओलावा झाला होता. याचा फायदा घेऊन शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली होती. मशागती,बियाणे, खते, कीटकनाशके, खुरपणी,कोळपणी इत्यादीवर मोठा खर्च केला होता. त्यामुळे रब्बी पिकांची जोमदार वाढ झाली होती.
अवकाळीचा रब्बी पिकांना दणका | Untimely rains hit rabi crops
परंतु अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत.शेतात पाणी साचुन पिकांना मर लागली आहे.
अवकाळीचा रब्बी पिकांना दणका | Untimely rains hit rabi crops
रब्बी पिकांबरोबर जनावरांना साठवलेल्या गवत, पिंजर,ऊसाचे वाडे इत्यादीचे भिजुन नुकसान झाले आहे. ऊस तोडणी बंद पडली आहे तोडलेला ऊस शेतातच पडलेला आहे .ऊस मजुरांचे हाल होत आहेत.शासनाने नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामा करावा व शेतकर्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अवकाळीचा रब्बी पिकांना दणका | Untimely rains hit rabi crops
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments