BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी कचऱ्यातून शोधली २७ हजाराची सोन्याची अंगठी|They found a 27,000 gold ring in the trash

त्यांनी कचऱ्यातून शोधली २७ हजाराची सोन्याची अंगठी|They found a 27,000 gold ring in the trash 

त्यांनी कचऱ्यातून शोधली २७ हजाराची सोन्याची अंगठी|They found a 27,000 gold ring in the trash 

शिराळा:नगरपंचायतच्या सहा सफाई कर्मचाऱ्यानी २७ हजार रुपयांची सोन्याची अंगठी कचरा विलागीकरण प्रामाणिकपणे करून शोधून काढली.  त्याबद्दल त्यांचा  सत्कार नगरपंचायत मार्फत नववर्षाच्या पूर्वसंध्येला करून अनोख्या पद्धतीने ३१ डिसेंबर  साजरा करत नववर्षाचे स्वागत केले.  

त्यांनी कचऱ्यातून शोधली २७ हजाराची सोन्याची अंगठी|They found a 27,000 gold ring in the trash 

शिराळा नगरपंचायत मार्फत नेहमी  कचरा संकलन केला जाते. त्याच प्रमाणे आज कचरा  संकलन चालु असताना नलिनी बाजीराव कदम यांनी  ही घंटागाडीत कचरा टाकला. त्यावेळी नजरचूकीने २७ हजार रुपये किमतीची  सोन्याची अंगठी घंटागाडीत पडली. त्या नंतर  बराच कालावधी गेल्यानंतर त्यांना आपली अंगठी घंटागाडीत कचरा टाकत असताना पडली असावी अशी शंका आली. त्यांनी  सुपवायझर गणेश काशिद व दिपक भोसले यांना फोन करुन माहिती दिली. यानंतर गणेश काशिद यांच्यासह सहा सफाई कर्मचारी यांनी  संपूर्ण दिवसाचा विलगीकरण करुन टाकण्यात आलेल्या कचऱ्यात अंगठी शोधण्याचा  प्रयत्न सायंकाळी ५ वाजे पर्यंत केला. त्या अथक प्रयत्नाने अंगठी सापडली. 

त्यांनी कचऱ्यातून शोधली २७ हजाराची सोन्याची अंगठी|They found a 27,000 gold ring in the trash 

त्या कर्मचाऱ्यांचा  नगरपंचायतचे  मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते शाल, बुके व रोख  १ हजार रुपये व  सुपरवायझर गणेश काशिद यांनी  संपूर्ण पेहराव  देवून सन्मान केला. संबंधित कर्मचारी व संपूर्ण यंत्रणेने दाखविलेले कर्तव्यतत्परता व  प्रमाणिकपणाबद्दल नालिनी  कदम व त्यांच्या कुंटूबियांकडून बुके व रोख रक्कम २०००  रुपये देवून गौरव केला. यावेळी पाणीपुरवठा सभापती मोहन जिरंगे, नगरसेवक उत्तम डांगे, नगरसेविका सिमा कदम, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

त्यांनी कचऱ्यातून शोधली २७ हजाराची सोन्याची अंगठी|They found a 27,000 gold ring in the trash 

Post a Comment

0 Comments