BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपघातातील चालक फरार|The driver of the accident is absconding

 अपघातातील चालक फरार|The driver of the accident is absconding

अपघातातील चालक फरार|The driver of the accident is absconding

शिराळा:येथील निवृत्त शिक्षक विलास वसंतराव कुलकर्णी (वय ७०),रा.पूलगल्ली,शिराळा) यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या डंपरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. कुलकर्णी यांच्या मृत्यू प्रकरणी चालकावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अपघातातील चालक फरार|The driver of the accident is absconding

 ही  घटना आज बुधवार (२९) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.प्रशांत हसबनीस यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. 

अपघातातील चालक फरार|The driver of the accident is absconding

   याबाबत पोलिसांनी दिलेली  माहिती अशी की मालवाहू डंपर (क्रमांक एम एच १० ए डब्ल्यू (७७७५) हा  भरधाव वेगाने बिऊर कडून पेठ नाक्याच्या दिशेने निघाला होता. तर मोपेड ( क्रमांक एम एच १० बी बी ०७९४ ) वरून विलास कुलकर्णी हे शिराळाहून मांगलेच्या दिशेने निघाले होते. गोरक्षनाथ मंदिरा समोरील बाह्य वळण रस्त्यावरील चौकात या दोन वाहनांची  धडक झाली.मोपेड गाडी डंपरच्या चाकाखाली गेल्याने त्याचा चक्काचूर झाला. विलास कुलकर्णी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातातील चालक फरार|The driver of the accident is absconding

 अपघातानंतर डंपर चालक पळून गेला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. .त्यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार हे करत आहेत.  त्यांच्या  पश्चात पत्नी , एक मुलगा, दोन विवाहित मुली , सून , नातवंडे असा परिवार आहे. ते शिराळा तालुका ब्राम्हण संघटनेचे अध्यक्ष व व्यापारी उमेश कुलकर्णी यांचे वडील होत.

अपघातातील चालक फरार|The driver of the accident is absconding

Post a Comment

0 Comments