शिराळा :राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व एस.टी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे,राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना पद निहाय ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करून राज्य शासनात विलीनीकरण व्हावे. राज्याच्या अर्थसंकल्पात एस.टीच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद कायमस्वरूपी व्हावी. या मागण्यांसाठी एस.टी कर्मचाऱ्यांचे गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशीलता दाखवत नाही हे सिद्ध झाले आहे. एस.टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांवर एकतर्फी दबाव व कारवाईचा बगडा उभारून हे एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे एस.टी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष व अस्वस्थता आहे.
एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे व सर्वसामान्यांसाठी एस.टी ची सेवा सुरू झाली पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांच्या मनात भावना आहे. या आंदोलनात आपण व्यक्तिशः लक्ष घालून एस.टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करावी. दरमहा वेतनासाठी शासनाकडून ठोस निधीची तरतूद करावी, एस.टी ला टोल टॅक्स मधून मुक्त करुन इतर राज्यांप्रमाणे प्रवासी करत १७.५ % ऐवजी ५ % प्रवासी कर आकारणी केल्यास एस.टी जनतेस सध्याच्या तिकीट दरापेक्षा कमी आकारात प्रवासी सेवा उपलब्ध करून देऊन एस.टीचे उत्पन्न नक्की वाढेल . शासनाच्या महसुलात वाढ होईल. या महत्त्वपूर्ण बाबी आपण राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देऊन सदरच्या आंदोलनाची यशस्वी सांगता होऊन महाराष्ट्रातील आम जनतेला एस.टी सेवा सुरळीत सुरू व्हावी. ही राज्यातील एस.टी कर्मचारी व आम जनतेची यशस्वी अपेक्षा आहे.
एस.टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व एस.टी.सेवा पूर्ववत होण्यासाठी पुढाकर घ्या-सत्यजित देशमुख | Take initiative for justice of ST employees and restoration of ST services - Satyajit Deshmukh
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments