मणेराजुरी (ता.तासगाव) येथील शिकोबा डोंगरावर एक तरुण व दोन तरुणींनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती समजताच तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली . घटनास्थळी डोरमिक्स नावाची द्राक्षबागेवर फवारण्याचे विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे . मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. या तिहेरी आत्महत्तेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या |Suicide by a young man and two young women at the same place
--------ही बातमी आणखी अपडेट झाली आहे.--------
हरिष हणमंत जमदाडे (वय २१), रा. मणेराजुरी, प्रणाली उध्दव पाटील(वय १९) मुळ रा. जायगव्हाण, सध्या रा. मणेराजुरी आणि शिवाणी चंद्रकांत घाडगे(वय १९) रा. हतीद, ता. सांगोला, जि. सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.
एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या |Suicide by a young man and two young women at the same place
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मणेराजुरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेकोबा डोंगर आहे. या डोंगरावर गुरुवारी सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिक जात असतानाच त्यांना तिघेजण मृतअवस्थेत आढळून आले. याची माहिती पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांना मिळाली. घटनास्थळावर विषारी औषधाची बाटली, तीन ग्लास, हार, तुरे, चॉकलेट असे साहित्य आढळून आले.
एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या |Suicide by a young man and two young women at the same place
ते बुधवारी रात्रीच्या सुमारास या डोंगरावर आले असल्याचा संशय असून आत्महत्येमागे प्रेमसंबंध की अन्य काही याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके करत आहेत.
एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या |Suicide by a young man and two young women at the same place
एका तरुणीने साडी परिधान केली होती. हार – तुरे असल्यामुळे लग्न करण्याचे नियोजन केले असावे, असे बोलले जात आहे. मात्र डोंगरावर येतानाच विषारी औषधाची बाटली घेवून आल्यामुळे नियोजन करूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. मात्र ही आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली की आणखी काही कारणामुळे झाली, याचा नेमका उलगडा अद्याप झालेला नाही.
एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या |Suicide by a young man and two young women at the same place
पोलिसांना तो सापडला पण असा
आत्महत्या केलेला हरीष जमदाडे हा काही महिन्यांपासून पोलिसांना हवा होता. तो चोरीच्या प्रकरणांतील संशयित आरोपी असून पोलिस त्याच्या मागावर होते. त्या तो सापडला पण मृतावस्थेत
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments