शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
या सर्व फेलोंची नावे
http://www.sharadpawarfellowship.com/result
या संकेतस्थळावर पाहता येतील.
शिराळा तालुक्यातील पावलेवाडी येथील लेखक व कवी विष्णू पावले यांना शरदचंद्र पवार पाठ्यवृत्ती जाहीर झाली आहे. पावले यांचे सध्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतीपुरुष क्रांतिसिंह नाना पाटील व प्रतिसरकार या विषयावर कादंबरी लेखन सुरु आहे. याच लेखनासाठी पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई’ यांच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीपसाठी कृषी क्षेत्रातील ८० तर साहित्यासाठी १० फेलोंची निवड करण्यात आली आहे.
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष आणि फेलोशिपच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आणि सहनिमंत्रक हेमंत टकले यांनी हे निकाल जाहीर केले.
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
शरद पवार यांच्या प्रदिर्घ कारकिर्दीला सलाम करण्यासाठी कृषी, साहित्य आणि शिक्षण या तीन क्षेत्रांसाठी फेलोशीप अनुक्रमे ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर शरदचंद्र पवार साहित्य फेलोशीप’ आणि ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन्’ या तीन फेलोशीपची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत या तिन्ही क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी व साहित्य क्षेत्रातील फेलोशीपसाठी ८ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शेकडो प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावांवर विचार करुन त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निवडसमितीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८० तर ‘शरदचंद्र पवार साहित्य फेलोशीप’ साठी १० अशा एकूण ९० फेलोंची निवड केली आहे.
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
कृषी क्षेत्रातील फेलोशीपसाठी प्रत्येकी ४० अशा दोन बॅचेस केल्या जाणार असून पहिल्या बॅचचे प्रशिक्षण दि. १२ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे. तर दुसरी बॅच २ मे २०२२ पासून सुरु करण्यात येईल. ‘शरदचंद्र पवार साहित्य फेलोशीप’ दि. १२ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली.
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
या दोन्ही फेलोशीप ११ डिसेंबर २०२१ रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व फेलोशीपच्या तज्ज्ञ सल्लागार समितीचे प्रमुख डॉ अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केल्या जाणार आहेत.
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी १ जानेवारीपासून अर्ज करता येणार
शिक्षण क्षेत्रातील ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’ साठी दिनांक १ जानेवारी २०२२ पासून प्रस्ताव सादर करता येणार असून या सर्व फेलोशीपसाठी पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती आणि एमकेसीएल फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
शरदचंद्र पवार साहित्य फेलोशीप
ललित: प्रदीप कोकरे (नवी मुंबई),
विष्णू पावले (कोल्हापूर),
प्राजक्ता गव्हाणे (पिंपरी-चिंचवड),
मृद्गंधा दीक्षित (पुणे)
ललितेतर : धनंजय सानप (जालना),
संध्या गवळी (दिल्ली),
कुंडलिक ढोक (लातूर)
अनुवाद : अभिषेक धनगर (मिरज, सांगली),
विकास पालवे (ठाणे)
विज्ञान साहित्य: असीम चाफळकर (बावधन, पुणे)
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
शरद पवार फेलोशिप इन ॲग्रीकल्चर – बॅच १ ( १२ डिसेंबर २०२१ पासून सुरु )
पुणे जिल्हा – रोहित गोरक्ष थिटे, सुचिता सुधीर निगडे, मयूर ज्ञानेश्वर गायकवाड, ऐश्वर्या चंद्रकांत गावंडे, अमेय तानाजीराव पवार
सातारा जिल्हा – कोमल रामचंद्र पवार, हेमंत अनिल सस्ते, पूर्वा धनाजी जगदाळे, अनुप अशोक मांढरे
कोल्हापूर जिल्हा – पूजा संभाजी पाटील,अनिकेत अनंत गवळी, प्राजक्ता सुरेश हंकारे
सोलापूर जिल्हा- विक्रमसिंह विलास पासले, शिवेंद्र जितेंद्र भोसले
सांगली जिल्हा – रवी दत्तू कांबळे
परभणी जिल्हा – प्रदुम्न सटवाजी गोरे, रंगोली अरुण पडघन
लातूर जिल्हा – शिवप्रसाद रामप्रसाद येलकर
हिंगोली जिल्हा – संभाजी जयवंतराव खिल्लारे
उस्मानाबाद जिल्हा – विनायक चंद्रकांत हेगना
बीड जिल्हा – प्रतिभा विश्वनाथ बनकर
नांदेड जिल्हा – पूजा संतोष राठोड
औरंगाबाद जिल्हा – तेजस्वी मधुकर पाटील
धुळे जिल्हा – दीप प्रमोद पाटील
जळगाव जिल्हा – प्रियांका दिलीप चौधरी
नाशिक जिल्हा – दीपक मारुती दाते, निकिता बापूसाहेब भालेराव
अहमदनगर जिल्हा – वैष्णवी भारत येलमामे
नंदुरबार जिल्हा – हर्शल मनोज पवार
बुलढाणा जिल्हा – अदिती दत्ता गवळी
अकोला जिल्हा- सचिन रुपराव ढगे
वाशीम जिल्हा – शिवाजी विश्वनाथ मळेकर
अमरावती जिल्हा – माधवी प्रकाश सोनोने
गडचिरोली जिल्हा – सुरज दिलीप भांडेकर
ठाणे जिल्हा – सुप्रिया सोमनाथ गारे
सिंधुदुर्ग जिल्हा- सुजल सुहास मुंज
रत्नागिरी जिल्हा – नगमा रफिक सुर्वे, नेहा मंगेश डाली
मुंबई उपनगर – अक्षय संपत जाधव
मुंबई शहर जिल्हा- प्रतीक्षा तुकाराम गर्जे
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
शरद पवार फेलोशिप इन ॲग्रीकल्चर – बॅच २ ( २ मे २०२२ पासून सुरु )
पुणे जिल्हा – दिव्यप्रभा धनपाल भोसले, अंकिता हिरालाल काटकर, नूतन अंकुश नपते, शेखर छबन लकडे
सातारा जिल्हा – आशुतोष महेश मोरे,पूनम संभाजी घोरपडे, सृष्टी सुनील जगताप
कोल्हापूर जिल्हा – योगेश वसंतराव पाटील, आदित्य प्रकाश गायकवाड
सोलापूर जिल्हा- आकांक्षा बाळासाहेब पवार, ऋषिकेश सुभाष जाधव
सांगली जिल्हा – श्रद्धा चंद्रकांत जाधव, प्रवीण बाळू इंगळे,
परभणी जिल्हा – राधिका कमलाकर कुन्नूर,केसुजी रावली
लातूर जिल्हा – मयुरी गणपती डोंगरे
हिंगोली जिल्हा – संगीता माधवराव मगर
उस्मानाबाद जिल्हा – दिपाली बाळासाहेब जाधव
बीड जिल्हा – लक्ष्मण मधुकर बोंद्रे
नांदेड जिल्हा – सतीश शिवाजी भुसे
औरंगाबाद जिल्हा – ज्ञानेश्वर माधवराव पांडव
जालना जिल्हा – अविनाश सुरेशराव प्रधान
धुळे जिल्हा – तेजल सुर्यकांत कोठावडे
जळगाव जिल्हा – सागर देविदास पाटील
नाशिक जिल्हा – साक्षी चंद्रकांत मेनगे
अहमदनगर जिल्हा – प्रशांत ज्ञानदेव बतुले
नंदुरबार जिल्हा – प्रियांका चतुर पाटील
बुलढाणा जिल्हा – आशुतोष भीमराव अवसरमोल
अकोला जिल्हा- प्राजक्ता गणेश बोचरे
वाशीम जिल्हा – रोशनी बाबुराव मानमोटे
अमरावती जिल्हा – अक्षय मनोहरराव राऊत
यवतमाळ जिल्हा – धीरज सुरेश राठोड
नागपूर जिल्हा- तोष्णा योगेश साखरे
गोंदिया जिल्हा – विपिन वामन ब्राह्मणकर
ठाणे जिल्हा – सुरज रामसुरत मिश्रा
सिंधुदुर्ग जिल्हा- ओंकार दिनानाथ परब
रत्नागिरी जिल्हा – प्रसाद मनोहर नवरे , गौरव संतोष खेडकर
रायगड जिल्हा – सायली प्रवीण पाटील
मुंबई उपनगर – दिव्या राजू देवकर
शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहिर कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड| Sharad Pawar Inspire Fellowship Results Announced
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments