BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पणुंब्रे वारूण (ता.शिराळा ) येथे तांदूळ महोत्सव |Rice Festival at Panumbre Varun (Tal. Shirala)

पणुंब्रे वारूण (ता.शिराळा )  येथे तांदूळ महोत्सव |Rice Festival at Panumbre Varun (Tal. Shirala)

पणुंब्रे वारूण (ता.शिराळा )  येथे तांदूळ महोत्सव |Rice Festival at Panumbre Varun (Tal. Shirala)
 
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत जोतिर्लिंग शेतकरी बचत गट पणुंब्रे वारूण यांच्या  संयुक्त विद्यमाने पणुंब्रे वारूण (ता.शिराळा )  येथे तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता.  यामध्ये भाताच्या नामशेष होत चाललेल्या औषधी गुणधर्म असणाऱ्या विविध ११ जातींच्या वाणांचा तांदूळ महोत्सव भरवण्यात आला.

पणुंब्रे वारूण (ता.शिराळा )  येथे तांदूळ महोत्सव |Rice Festival at Panumbre Varun (Tal. Shirala)

 या महोत्सवामध्ये नैसर्गिक मध, सेंद्रिय नाचणी, वरी विक्रीसाठी बचत गटामार्फत ठेवले होते.आत्मा प्रकल्प संचालक  मनोजकुमार वेताळ म्हणाले, खरीप हंगाम मध्ये भाताच्या नामशेष होत चाललेल्या औषधी गुणधर्म असलेल्या विविध ११ वाणांची आता मोठी गरज आहे.   कर्करोग, सांधेदुखी, मधुमेह, रक्ताची कमतरता कमी करणारे, आयर्न व झिंक यांची कमतरता दूर करणारे, गरोदर महिला व लहान बालकांसाठी उपयुक्त वाणांचे संवर्धन व संगोपन करावे. या वाणांना  बाजारपेठेत मागणी व हमीभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी याची  लागवड करून निरोगी व सदृढ आरोग्य व आर्थार्जन वाढवावे. 

पणुंब्रे वारूण (ता.शिराळा )  येथे तांदूळ महोत्सव |Rice Festival at Panumbre Varun (Tal. Shirala)
 
 या कार्यक्रमास कृषि विकास अधिकारी विनायक कुंभार,मिरज उपविभागीय कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ, जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी व शिराळा तालुक्यातील सर्व मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषि सहाय्यक, शेतकरी मित्र, प्रगतशील शेतकरी, ज्योतिर्लिंग शेतकरी बचत गटातील सर्व सदस्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

पणुंब्रे वारूण (ता.शिराळा )  येथे तांदूळ महोत्सव |Rice Festival at Panumbre Varun (Tal. Shirala)

तांदूळ महोत्सवात नागरिकांना चांगल्या प्रतीचा तांदूळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या सभासदांपैकी कोणीही व्यापारी नाही. ना नफा ना तोटा तत्त्वावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

          अंकुश पाटील माजी उपसरपंच  पणुब्रे वारुण

Post a Comment

0 Comments